१३ महिन्यांच्या तुरुंगवासात कैद्याने बनवलं असं सॉफ्टवेअर की, न्यायालयाने केले त्याचं तोंडभरून कौतुक

इंजिनिअर आपल्या कलागुणांमधून नव-नवीन देणं या डिजिटल युगाला देत असतात. त्यातच आता १३ महिन्यांची शिक्षा भोगणाऱ्या अमित या कैद्याने एक नवा सॉफ्टवेअर तयार केला आहे. विशेष म्हणजे तुरुंगात राहून तयार केलेले हे सॉफ्टवेअर तुरुंगाचे व्यवस्थापन सुधारण्यासंदर्भातील आहे.

अमितने तयार केलेलं सॉफ्टवेअर पाहून सर्वोच्च न्यायालय आणि इतर वकींलांनाही आश्चर्याचा धक्का बसला असून त्यांनीही या कामासाठी अमितचे तोंडभरून कौतुक केले आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्थान टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.

अमितच्या पत्नीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी अमितला १३ महिन्यांकरिता हरियाणामधील तुरुंगात ठेवण्यात आले होते. या कालावधीत तुरुंगातील डिजिटल व्यवस्था अधिक बळकट आणि सुधारण्यासाठी त्याने हे सॉफ्टवेअर बनवले आहे. एक वर्ष तुरुंगात राहिल्यावर अमितची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र त्यानं केलेल्या कामगिरीबद्दल कोर्टाने सुद्धा त्यांची पाठ थोपटली आहे.

न्यायमुर्ती हेमंत गुप्ता यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने सर्व राज्यांनी अमितने बनवलेले सॉफ्टवेअर पहावं असा सल्ला दिला आहे. तुरुंगांमधील सुधारणांसाठी हे सॉफ्टवेअर उपयोगी ठरु शकते. त्यामुळेच केवळ हरयाणाचा नाही तर देशातील इतर राज्यांनाही या सॉफ्टवेअरचा वापर शक्य आहे का यासंदर्भातील विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Team Global News Marathi: