होय… मी 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करतोय, राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्याने केली घोषणा

9 जिल्हा परिषद सदस्य माझ्यासोबत राहणार आणि गुहागर पंचायत समिती आणि 73 सरपंच हे माझ्यासोबत असल्याचे भास्कर जाधव म्हणाले आहेत.

मुंबई | विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर विरोधपक्षांमधील नेते सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तर एकामागोमाग धडाकाच लावला आहे. गुहागरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी अखेर घरवापसीचा निर्णय घेतला आहे.

होय, मी 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करत आहे, अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली आहे. तसेच 9 जिल्हा परिषद सदस्य माझ्यासोबत राहणार आणि गुहागर पंचायत समिती आणि 73 सरपंच हे माझ्यासोबत असल्याचे भास्कर जाधव म्हणाले आहेत.

भास्कर जाधव म्हणाले की, शरद पवार यांच्याशी बोलल्यानंतर मी राष्ट्रवादी सोडली. माझं म्हणणे मी लिखित स्वरूपात पवार साहेबांकडे दिले असल्याचे ते म्हणाले. तसेच सर्व गुहागर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य 72 गावाचे सरपंच यांच्यासह सर्वांचा राष्ट्रवादीला रामराम करत आपल्या सोबत प्रवेश करणार राष्ट्रवादी सोडत असताना आपण कुठल्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याचा फोटो अथवा झेंडा जो असेल तो कार्यकर्ते यांनी आपल्या कार्यालयात जमा करावा त्याची कोणतेही नासधूस होता कामा नये असे त्यांनी सांगितले आहे.

कोण आहेत भास्कर जाधव ?

1982 मध्ये भास्कर जाधव शिवसैनिक म्हणून पक्षात आले.1995 ते 2004 या काळात ते चिपळूणमधून दोन वेळा आमदारपदी निवडून आले. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक लहान-मोठी पदंही भूषवली. 2004 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता.

2004 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ते अपक्ष उमेदवार म्हणून उतरले, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. 2009 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला. आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे नऊ खाती सोपवण्यात आली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही त्यांना सोपवण्यात आलं होतं.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: