हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला, उद्या करणार भाजपमध्ये प्रवेश

पुणे । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. उद्या मुंबईमध्ये दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

हर्षवर्धन पाटील यांनी चार सप्टेंबरला जन संकल्प मेळावा घेतला होता आणि या मेळाव्यातून हर्षवर्धन पाटील समर्थकांनी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा व विधानसभा लढवावी हा सल्ला पाटील यांना दिला होता आणि अखेर आज सूत्रांकडून माहिती मिळते की उद्या हर्षवर्धन पाटील दुपारी तीन वाजता मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भाजपच्या मान्यवर नेत्यांच्या उपस्थित हा प्रवेश सोहळा होणार आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाने राज्यातील काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. हर्षवर्धन पाटील हे राज्यातील सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.

इंदापूर विधानसभा मतदार संघांचे त्यांनी सलग 4 वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे.यामध्ये सलग 3 वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा राज्यात विक्रम हर्षवर्धन पाटील यांनी केलेला आहे.त्यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती शासनात 5 वर्षे व त्यानंतर आघाडी शासनात सलग 14 वर्षे मंत्री म्हणून उत्कृष्ठपणे काम केले आहे.

त्यांनी एकूण 6 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे. राज्यातील जेष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे. इंदापूर विधानसभेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील हे नाराज होते.इंदापूरच्या गाजलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशाची मागणी केली होती. इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील हे भाजपकडून लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: