सोलापूरात कोरोनाचा आणखी एक मृत्यू ;37 जणांवर उपचार सुरू-जिल्हाधिकारी

सोलापूरात कोरोनाचा आणखी एक मृत्यू ;37 जणांवर उपचार सुरू-जिल्हाधिकारी

सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 41 झाली आहे .आज आणखीन दोन रुग्ण बापुजी नगर भागात मिळून आले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली .

ते म्हणाले, सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या 41 झाली असून त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतरांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजचे दोन्ही रुग्ण पुरुष आहेत .

एका महिलेला बापुजी नगर भागातून सारी चा त्रास होऊ लागल्याने 20 एप्रिल ला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं .तिचा आज सायंकाळी मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या 4 झाली आहे. आतापर्यंत सोलापुरात कोरोना चाचणीसाठी 907 जणांचे स्वॅब घेण्यात आले यातील 866 जणांची चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे .तर 41 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सोलापूर शहरात आज आज सकाळी संचारबंदीत अत्यावश्यक अन्नधान्य भाजीपाला खरेदीसाठी सवलत देण्यात आली होती. मात्र या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर आले सोशल डिस्टन्स चा बोजवारा उडाला अखेर पोलीस प्रशासनाने काठीचा धाक दाखवीत लोकांना तसेच विक्रेत्यांना हुसकावून लावलं काही जणांची दुचाकी ,चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केली आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: