सोपल-राऊतांचे शक्तीप्रदर्शनाद्वारे अर्ज दाखल करण्याचे दिलेले परवाने केले रद्द,वाचा सविस्तर-

बार्शी: बार्शी विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील एक संवेदनशील म्हणून ओळखला जातो. गेल्या वीस वर्षांपासून याठिकाणी दिलीप सोपल व राजेंद्र राऊत या पारंपरिक विरोधकात प्रत्येक निवडणुकीत लढत होत आहे.

त्यामुळे आपले पारडे कसे जड आहे हे दाखवण्यासाठी हे नेते नेहमीच शक्तिप्रदर्शन करून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत असतात, त्याचाच भाग म्हणून यंदा ही दोघांनी अर्ज दाखल करण्यासाठी परवानगी मागितली, परंतु दोघांनी एकाचदिवशी ती मागितल्या ने दोघानाही ती नाकारली आहे.

बार्शीतील दिलीप सोपल व राजेंद्र राऊत या दोन्ही नेत्यांनी मिरवणुकीद्वारे अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार दि.४ आॅक्टोबर रोजीची परवानगी पोलीस स्टेशनकडे मागीतली होती़ त्यानूसार अगोदर अर्ज आला म्हणून सोपल गटाला ११ ते १ तर राऊत गटाला १ ते ३ अशी वेळ देऊन परवानगी दिली होती.

मात्र एकाच दिवशी दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची कल्पना जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी बार्शी शहर पोलीसांना सुनावले़ त्यामुळे तात्काळ शहर पोलीसांनी आम्हाला मिळालेल्या माहितीनूसार बार्शीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणहोऊ शकतो त्यामुळे दिलेल्या परवानग्या रद्द करीत असल्याचे पत्र दोन्ही नेत्यांना दिले आहेत.त्यामुळे यंदा शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्याचे दोघांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत हे मात्र खरे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: