सोनं आणि चांदी पुन्हा महागलं, पाहा आजचे दर

नवी दिल्ली: सोन्याच्या दरात सोमवारी वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. दिल्लीमध्ये सोन्याच्या दरात चार रुपये प्रति ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत सोन्याचा दर ४०,७४८ रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याची माहिती दिली आहे. गेल्या व्यापारी सत्रात सोन्याचा दर ४०,७४४ रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. सोन्याच्या दरासोबतच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.

सोमवारी चांदीच्या दरात सात रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे चांदीचा दर ४७,८६३ रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. गेल्या व्यापारी सत्रात चांदीचा दर ४७,८५६ रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तपन पटेल यांनी सांगितले की, राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याच्या दरात चार रुपयांनी वाढ झाली आहे. 

सोमवारी बाजाराच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात घसरण झाली होती. दिवसाच्या सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपयातही चार पैशांनी घसरण झाली होती यामुळे रुपयाची किंमत ७१.१२ रुपये प्रति डॉलर इतकी झाली होती. यापूर्वी शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ७१.०८ रुपयांवर पोहोचला होता. 

मुंबईतील सोन्याचे दर:

२२ कॅरेट सोनं: ३,९०० रुपये प्रति एक ग्रॅम 

२२ कॅरेट सोनं: ३९,००० रुपये प्रति १० ग्रॅम 

२२ कॅरेट सोनं: ३,८५,१०० रुपये प्रति १०० ग्रॅम

२४ कॅरेट सोनं: ४,००० रुपये प्रति एक ग्रॅम 

२४ कॅरेट सोनं: ४०,००० रुपये प्रति १० ग्रॅम 

२४ कॅरेट सोनं: ४,००,००० रुपये प्रति १०० ग्रॅम 

मुंबईतील चांदीचे दर:

४९.५० रुपये प्रति एक ग्रॅम 

४९५ रुपये प्रति १० ग्रॅम 

४,९५० रुपये प्रति १०० ग्रॅम 

४९,५०० रुपये प्रति किलोग्रॅम 

ग्लोबल न्युज नेटवर्क: