सुपरफास्ट हेडलाईन: पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढइशारा पातळी गाठण्यास अवघे दोन फूट शिल्लक

खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन

वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ

विषेश बातमी : अक्कलकोट : शहरात सध्या पाणी-बाणीची परिस्थिती असून नगरपालिकेकडून 22 दिवसा आड पाणी पुरवठा केला जात आहे. तहानलेल्या अक्कलकोटकरांना आचेगावच्या बब्रुवाहन माने देशमुख यांचा जयहिंद फाउंडेशनने पाणी दिले आहे. अक्कलकोट शहराला त्यांनी पाण्यासाठी पाचटँकर सुरू केले आहेत. त्या माध्यमातून वेगवेगळ्या भागात मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे. यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

वॉशिंग्टन : जम्मू-काश्मीरमधून ५ ऑगस्टला आर्टिकल ३७० हटवल्यानंतर अमेरिकन सरकारने काश्मीरमधील तणाव कमी करण्याचा आग्रह धरला आहे. काश्मीरमधील तणाव कमी करण्यासाठी तेथे लावण्यात आलेले निर्बंध आणि राजकीय वावर कमी करावा, असे अमेरिकेने म्हटले आहे.

श्रीनगर : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेतला. काश्मीर खोऱ्यातील ९२. ५ टक्के भूभागावर कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने काश्मीरातील परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहेत, असे डोवाल म्हणाले. तसेच मोठ्या प्रमाणात काश्मीरींचा आर्टिकल ३७० हटवण्याला पाठिंबा आहे असेही त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली : चंद्रापासून २ .१ किमी दूर असताना विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. मात्र, चांद्रयान २ मोहीम ९० ते ९५ टक्के फत्ते झाल्याचे सरकारने म्हटले आहे. ऑर्बिटर चंद्राभोवती फिरतच असून त्याद्वारे चंद्राबद्दल वैज्ञानिक माहिती जाणून घेण्यास मदत होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. तर विक्रम लँडरशी संपर्क साधण्यास १४ दिवसांता कालावधी लागू शकतो, असे इस्त्रोचे प्रमुख के. सिवान म्हणाले.

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या गड किल्ले भाड्याने देण्याच्या धोरणावर राज्यभरातून टीका होत आहे. आज डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली. सरकारला उत्पन्न मिळवायचे असेल तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावे, असे राज ठाकरे म्हणाले.

नागपूर : सरकारी मदतीवरती आमचा बहिष्कार आहे. कोणत्याही कामात मी सरकारची मदत घेत नाही. आम्हाला मदत नको पण, चालत्या कामात सरकारने खिळे टाकून ते काम पंक्चर करण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारला लगावला आहे. नागपूरमध्ये विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाच्या सामंजस्य करार कार्यक्रमावेळी गडकरी बोलत होते. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर देखील उपस्थित होते.

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल औरंगाबाद येथे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल करिडॉरमधील औरीक सिटीच्या भव्य हॉलचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील बचत गटांच्या महिलांनाही संबोधित केलं. देशातील प्रत्येक कुटुंबाला 2022 पर्यंत आपल्या स्वप्नातील पक्कं घर देणार असल्याचीही घोषणा यावेळी मोदींनी केली.

अहमदनगर : काँग्रेसची महागळती थांबायचे नाव घेत नाही. एका पाठोमाग एक नेते काँग्रेस, राष्ट्रवादीला रामराम ठोकत आहेत. श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसला आहे. श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

अहमदनगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि भाऊसाहेब कांबळे यांच्या पक्षांतरुन नाव न घेता टीका केली आहे. बाळासाहेब थोरात संगमनेर येथे महिला मेळाव्यात बोलताना परिवारावर संकट आला म्हणून पळून जायचा का ? सत्ता बदलले की उड्या मारण्याची राजकारण आपण करत नाही असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

कोल्हापूर: मुंबई कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पुन्हा वाढला असून कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होऊन ते 37 फुटावर पोहोचली आहे. महापूराची 39 फुटांची इशारा पातळी गाठण्यास अवघे दोन फूट शिल्लक राहिल्याने नागरिकांनी धास्तीने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

कोल्हापूर : ऐन विधानसभा निवडणूकिच्या तोंडावर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष पद रिक्त झाले होते. त्यानंतर कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी अखेर आमदार सतेज पाटील यांची वर्णी लागली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सतेज पाटील यांची निवड केल्याचे पत्र काल शनिवारी दिले आहे.

दक्षिण सोलापूर : मंद्रूप येथील सीतामाई तलावात उजनीचे प्राणी कॅनॉल द्वारे आणण्याचे काम प्रगती पथावर असून, दोन किलोमीटर जलवाहिनीच्या खड्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या योजनेचे काम सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल आणि ऑक्टोबर महिन्यात तलावात पाणी येईल. अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

माढा : आमदार बबनराव शिंदे यांनी अखेर पक्षांतराच्या प्रश्नावर मौन सोडले आहेत. आपल्यासमोर भाजप- शिवसेनेसह सर्व पर्याय खुले असून कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन विचार-विनिमय करूनच जो काही निर्णय घ्यायचा तो घेतला जाईल. असे स्पष्ट भूमिका त्यांनी कालच्या बैठकीत मांडली आमदार बबनराव शिंदे हे काल पिंपळनेर येथे उपळाई आणि मोडनिंब जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.

पंढरपूर: उजनी धरणातून पुन्हा एकदा भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. परंतु तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाई असून उजनी डाव्या या कालव्यातून फाटा क्रमांक 38 व 39 ला पाणी सोडावे अशी मागणी सहा ग्रामपंचायतीने केली असून अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अक्कलकोट : शहराला सध्या भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईबाबत नगर परिषद कडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना होत नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रासप शिवसेना प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला हार घालून निवेदन करण्यात आलेत. यावेळी रासपचे जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर, रिपाईचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश पवार, प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अमर शिरसाट यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

अक्कलकोट: अक्कलकोट तालुका कायम दुष्काळाने पीडित आहे. तालुक्यात पिण्याचा पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी लोकांना यातना भोगावे लागतात याकडे शासन, किंवा लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. त्यामुळे तालुक्यातील पाणी प्रश्नाकडे शासनाच्या लक्ष वेधण्यासाठी करजगी येथील चार तरुण काल सकाळी आठ वाजता अक्कलकोट तालुक्यातील पान मंगरूळ पासून थेट मुंबईतील मंत्रालयापर्यंत पायी वारी निघाले आहेत. करजगी येथील महेश कटारे, किरण गावडे, नरसप्पा गुजा आणि आसिफ यतनाळ असे या चार युवकांचे नावे आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: