ज्येष्ठ वकील आणि कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांचे निधन

ज्येष्ठ वकील आणि प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांचे वयाच्या 95व्या निधन झाले. जेठमलानी हे देशातील नामवंत वकील म्हणून ओळखले जात होते.

त्यांनी देशाचे कायदा मंत्री पदही भूषवले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून ते खूप आजारी होते. रविवारी त्यांचे दिल्लीत निधन झाले, अशी माहिती जेठमलानी कुटुंबीयांनी दिली आहे.

वकील म्हणून त्यांच्या कारकिर्दीत काही महत्त्वाच्या केसेस अत्यंत गाजल्या. पुण्याचे मंजुश्री सारडा प्रकरण, इंदिरा आणि राजीव गांधी हत्या प्रकरण, जेसिका लाल हत्या प्रकरण, कवास नानावटी प्रकरण अशा काही गाजलेल्या केसेसमध्ये ते वकील म्हणून कार्यरत होते.

त्याखेरीज हर्षद मेहता, केतन पारेख, हाजी मस्तान, आसाराम बापू, लालू प्रसाद यादव यांच्यातर्फेही त्यांनी वकील म्हणून खटले लढवले होते.त्यांच्या निधनाने वृत्त समजताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या घरी जाऊन पार्थिवाचे दर्शन घेतले.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: