सावधान! दाढी आणि कटींगसाठी सलुनला जाणार आहात? मग ही बातमी नक्की वाचा

तुमच्यासाठी नक्कीच महत्वाची आहे. कारण सलूनमधूनही कोरोनचा प्रसार होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील बडगावात सलूनमधून सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेनं सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे.

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचे केस आणि दाढीसाठी वापरात आणलेल्या कात्री आणि कापडाचे वापर इतरांसाठी केल्याने कोरोना व्हायरसचा प्रसार झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सलूनमधूनही कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, ही बाब आता चिंता व्यक्त करणारी आहे

तहसिलदार मुकेश निगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना पॉझिटिव्ह असलेला एक तरुण इंदौरहून बडगांवात आला होता.केस कापऩे आणि दाढी करण्यापूर्वी त्याने कोरोना चाचणी केली होती, मात्र अहवाल हा आलेला नव्हता. त्यामुळे केस आणि दाढी करण्यापूर्वी त्याला कोरोना पॉझिटिव्ह असल्याबाबतची माहिती नव्हती. ज्या सलुनधारकाने संबंधित व्यक्तीचे केस आणि दाढी केली, त्यासाठी वापरण्यात आलेली कात्री आणि कापड इतरांसाठी वापरल्यामुळे कोरोनाचा प्रसार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील खरगोन येथील बडगाव हेअर करिंट सलूनमध्ये केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी गेलेल्या सहा जणांना कोरोना झाला आहे. असंही म्हटलं जात आहे की, त्या सलूनमध्ये कटिंगसाठी आणि शेविंगसाठी गेल्यामुळे कोरोनाचा प्रसार झाला. 

संबंधित व्यक्तीच्या कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ही बाब समोर आली. त्यानंतर 5 एप्रिलला सलूनमध्ये दाढी आणि कटींग केलेल्या 26 लोकांची कोरोना चाचणी केली आहे. त्यापैकी 17 जणांची रिपोर्ट हे नेगिटिव्ह आले असून नऊपैकी सहा जणांना कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 

ग्लोबल न्युज नेटवर्क: