भारतीय वेशभूषेत दिसली इवांका ट्रम्प, या डिझायनर ने बनवला पोशाख, पण ती झाली ट्रोल

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्रपती सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या दोन दिवसीय यात्रेसाठी ते सहकुटुंब भारतात आले आहेत. सोमवारी अहमदाबादमध्ये झालेल्या भव्य स्वागत समारंभात मोटेरा स्टेडिअममध्ये ट्रम्प यांनी लाखोंच्या संख्येत लोकांना संबोधित केलं. त्यानंतर आग्र्याला ताजमहल बघितल्यानंतर ते दिल्लीला आले. आज दिल्लीमध्ये ट्रम्प कुटुंबियांचा मुक्काम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलानिया आणि मुलगी इवांका आणि जावई कुश्नर सुद्धा आहे. या दौऱ्यादरम्यान अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया आणि इवांका ट्रम्प यांच्या पोशाखाची चर्चा सुद्धा जोरात सुरू आहे.

या दौऱ्यामध्ये मेलानिया जिथं पांढऱ्या पोशाखामध्ये दिसत आहेत, तर इवांका सुद्धा आपल्या स्टाईलनं सर्वांना इंप्रेस करतेय. मंगळवारी दिल्लीत इवांकानं भारतीय स्टाईलचा ड्रेस कॅरी केला. इवांकानं डिझायनर अनिता डोंगरे यांनी डिझाईन केलेली शेरवानी आणि त्यासोबत ट्राउझर घातलं. जिथं इवांकाच्या या लूकचं सर्व जण कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियावर डिझायनर अनिता डोंगरे यांना ट्रोल केलं जातंय.

जाणून घ्या कसा आहे इवांकाचा ड्रेस

इवांकानं घातलेला ड्रेस अनिता डोंगरे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. फोटोसोबतच या ड्रेसचं वैशिष्ट्य सुद्धा त्यांनी सांगितलं. ही एक सुरुही शेरवानी आहे जी प्योर सिल्कपासून बनवली आहे. हा ड्रेस पश्चिम बंगालमध्ये हाथांनी शिवला गेला आहे. या शेरवानी स्टाईलचं स्टेटमेंट वाढविण्यासाठी खास फ्रंट बटन्स लावल्या गेल्यात. या बटन्सवर अनिता डोंगरे यांच्या ब्रँडचा सिग्नेचर एलिफंट लोगो काढलेला आहे. डिझायनरच्या वेबसाईटवर या ड्रेसची किंमत ८२,४०० रुपये सांगितली गेली आहे.

का होतेय डिझायनर अनिता डोंगरे ट्रोल?

अनेक लोकांचं म्हणणं आहे की, अनिता डोंगरे यांनी इवांका ट्रम्पसाठी ड्रेस डिझाईन करायला नको होता. मुद्दा असा आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही वक्तव्यांवर आणि कामांवर टीका केली जातेय.त्याचमुळे सोशल मीडियावर त्यांच्या भारत दौऱ्याचाही निषेध केला गेला होता. इवांका ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी तर आहेच सोबतच ती त्यांची सीनिअर अॅडव्हायझर आहे, म्हणून लोकं अनिता डोंगरे यांना ट्रोल करत आहेत.


ग्लोबल न्युज नेटवर्क: