सत्तेत आल्यास नोकरीत स्थानिकांना 75 टक्के आरक्षण देणार;अजित पवार

सोलापूर :  माझा 30 वर्षांचा अनुभव मी पणाला लावणार पण आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही 175 जागा जिंकणार, असा विश्वास व्यक्त करत ,आमचं सरकार सत्तेत आल्यास सरकारी आणि खासगी नोकरीत 75 टक्के आरक्षण लागू करू, असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे. ते आज सोलापूरात बोलत होते.

लोकसभेला आम्हाला वंचितमुळे 12 जागांवर फटका बसला. पुरोगामी शक्तींनी जातीयवादी शक्तींविरोधात एकत्र यावं. म्हणूनच वंचितने आमच्याबरोबर येऊन जातीयवादी शक्तींचा मुकाबला करायला हात बळकट करावेत, असं आवाहन अजित पवार यांनी वंचितला केलं आहे.

सरकार आज अनेक संस्थांचा वापर करत विरोधकांना घाबरवण्याचं काम करत आहे. आमचं सरकार सत्तेत असताना आम्ही अशा प्रकारचं काम कधी केलं नव्हतं, असंही ते म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: