सकाळच्या रम्य पहरी । अश्‍व धावले रिंगणी । बेलवाडीत तुकोबांच्या पालखीचे पहिले गोल रिंगणसंपन्न

भवानीनगर: वारीच्या वाटेवर रिंगण सोहळा हा वारकऱ्याना आंनद देणारा उत्साहीत करणारा सोहळा असतो यामुळे वारकऱ्याना बेलवाडीतील रिंगण सोहळ्याची उत्सुकता असते
संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सणसरचा मुक्काम आटपून गुरुवारी  सकाळी साडेसात वाजता बेलवाडीमध्ये रिंगण सोहळ्यासाठी दाखल झाला. तोफांची सलामी देत पालखीचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले.

शालेय विद्यार्थानी लेजिम बँडचें प्रत्यशिक यावेळी सादर केले, इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पालखी सोळ्यातील अश्‍वाचे पुजन केले . त्यांनतर पालखी तळावर संत तुकाराम महारांजाच्या पादुका ठेवून रिंगण सोहळ्याला सुरवात झाली.

पताकावाल्याने देहभान विसरुन रिंगण सोहळ्याला पहिली फेरी मारली. त्यानंतर मानाच्या मेंढ्यांचे रिंगण झाले. उंच उंच पताका गगनाशी जणू स्पर्धाच करीत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

डोक्यावरती तुळस व पाण्याची कळशी घेवून महिलांनी रिंगण सोहळ्याला फेऱ्या मारुन देहू पासुन आलेले शिन घालवला. विणेकरी,टाळ-मृंदुग वालेही देहभान हरपून रिंगण सोहळ्यामध्ये धावत होते. त्याचवेळी दिंद्यायचे भजन सुरू होते त्यामुळे पूर्ण परिसर हा तुकारामाच्या गजराने नाहून निघाला
अश्‍वानांनी रिंगण साेहळ्याला पाच फेऱ्या मारुन रिंगण सोहळा पूर्ण केला. रिगणं झाल्यानंतर वारकऱ्यानी रिगनातं धावलेल्या अश्‍वाचे दर्शन, व माती कपाळाला लावण्यासाठी एक गर्दी केली

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडी उच्चार
विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल

असे म्हणत रिंगण पूर्ण होताच वैष्णवांनी विविध खेळ खेळण्यास सुरवात केली. फुगडी खेळण्यामध्ये वैष्णव, वारकरी दंग झाले होते.

बेलवडी गावात सर्वत्र जेवणाचे आयोजन करण्यात आले होते , त्याचा आंनद वरकर्यानी घेतला
त्यानंतर दुपारी हिरवयागार शिवारातून रिंगणाचा आंनद मनात साठवत सोहळा पुढे सरकत होता या परिसरात केळीच्या बाग, उसाचे मळे यामध्ये वारकरी विश्रांती घेत होते
विश्रांती झाल्यावर पालखी बेलवनडी, शेळगाव फाटा आथुरणे मार्गे निमगावकेतकी ला पोहचली येथे देखील पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले आज पालकी निमगाव केतकी येथे मुक्कामी असणार आहे शुक्रवारी सकाळी इंदापूर च्या दिशेने मार्गसंस्थ होणार आहे

ग्लोबल न्युज नेटवर्क: