संसदेत धार्मिक घोषणाबाजीला परवानगी नाही; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचा इशारा

नवी दिल्ली:
१७ व्या लोकसभेचे नवनियुक्त अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेत अनावश्यक मुद्द्यांवरुन गोंधळ घालणाऱ्यांना इशारा दिला आहे. संसदेत धार्मिक घोषणाबाजीला परवानगी देण्यात येणार नाही तसेच दिलेल्या जागेतच जाऊन आंदोलन करण्यात यावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बिर्ला म्हणाले, संसदेत घोषणाबाजी करणे, प्लेकार्ड दाखवणे किंवा वेलमध्ये येणे योग्य नाही. यासाठी एक विशिष्ट जागा असून त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करता येऊ शकेल. खासदारांना जे काही करायचे आहे. आरोप करायचे आहेत किंवा सरकारवर हल्लाबोल करायचा असेल तर ते करु शकतात मात्र, गॅलरीमध्ये येऊन त्यांनी हे करणे अपेक्षित नाही.

लोकसभेत सदस्यांच्या शपथविधीदरम्यान यावेळी जय श्रीराम, जय भारत, वंदे मातरम अशी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली होती. या घोषणाबाजी तुमचे मत काय? असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, हे जुने मुद्दे असून चर्चेदरम्यान ते मागे पडतात. वेगवेगळ्या परिस्थितीत अशी घोषणाबाजी केली जाते. ती परिस्थिती काय असेल त्यानुसार याबाबत लोकसभा अध्यक्षाच्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती निर्णय घेत असते.

लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्षांच्या स्वागपर भाषणात अशा धार्मिक घोषणाबाजींचा उल्लेख करीत अशा घोषणा या विविध पक्षीय लोकशाहीची भावना नाही असे म्हटले होते.

यावर बोलताना बिर्ला म्हणाले, याबाबत माझे मतं स्पष्ट आहे. संसद हे लोकशाहीचे मंदीर असून या मंदिराचे कामकाज संसदेच्या नियमांनुसार चालते. मी सर्व पक्षांना विनंती केली आहे की, आपल्याला जितके होईल तितके या जागेचा सन्मान राखण्याचा प्रयत्न करायला हवा. आपली जागातील सर्वात मोठी लोकशाही असल्याने प्रत्येकाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या संसदीय प्रक्रियांद्वारे आपण जगात एक उदाहण निर्माण करायला हवे.

राजस्थानच्या कोटा येथून दोन वेळेला खासदार म्हणून निवडून आलेले आणि लोकसभा अध्यक्ष झालेले ओम बिर्ला म्हणाले, सर्व पक्षांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला ही संधी दिली आहे. त्यामुळे माझे हे कर्तव्य आहे की, मी त्यांचा विश्वास कायम राखण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रत्येकाला अभिव्यक्तीचा अधिकार आहे. सरकारकडे मोठे बहुमत असल्याने त्यांना अधिक जबाबदार व्हावे लागेल. त्यांना विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.

…………………

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.

धिरज करळे: