चंद्रबाबूंना झटका; चार खासदारांनी केला भाजपमध्ये प्रवेश 

दिल्ली: चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठा पराभाव झाला. आता पुन्हा एकदा तेलुगू देसम पक्षाला मोठा झटका बसला आहे. कारण पक्षाच्या सहा राज्यसभा खासदारांपैकी चार जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चारही खासदारांनी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

दरम्यान,  खासदार वायएस चौधरी, खासदार सीएम रमेश, खासदार टीजी व्यंकटेश आणि जीएम राव यांच्यासह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापैकी वायएस चौधरी आणि टीजी व्यंकटेश पक्षाचे ज्येष्ठ नेते असून चंद्राबाबू यांच्या जवळचे मानले जात होते, परंतु त्यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या खासदारांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चंद्राबाबू नायडू विदेशात असताना या खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चंद्राबाबू नायडू आपल्या कुटुंबासोबत युरोपमध्ये आहेत. २६ जून रोजी ते भारतात येणार आहेत.

धिरज करळे: