शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय शिवसेनेचा लढा थांबणार नाही; आदित्य ठाकरे

लोकशाहीत ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त तो पक्ष त्यांची ध्येयधोरणे राबवतो. शिवसेना सत्तेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सोडवत आहे. तसेच सत्तेत असलो तरीही सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी, समस्येसाठी संघर्ष सुरू आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय शिवसेनेचा लढा थांबणार नाही, असा दिलासा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज यवतमाळ येथे बोलताना दिला.

युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा विदर्भात असून यवतमाळ जिल्हय़ात या यात्रेचे सर्व स्तरांतील नागरिकांनी जोरदार स्वागत केले. नेर तालुक्यातील नेर, दारव्हा, वसफळ, यवतमाळ येथे आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. यवतमाळच्या पोस्टल मैदानावर झालेल्या आदित्य संवाद कार्यक्रमाला विद्यार्थी, युवक-युवतींनी तुडुंब गर्दी करत मोठा प्रतिसाद दिला.

भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या. तुम्ही सरकारचा पाठिंबा का काढत नाही, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला. त्यावर आदित्य ठाकरे यांनी श्sिावसेना सत्तेत राहून शेतकऱ्यांसोबत संघर्ष करत आहे. पीक विम्याच्या प्रश्नी शिवसेनेने मोर्चा काढल्यावर शेतकऱ्यांना न्याय मिळतो.

तसेच संपूर्ण कर्जमुक्ती होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले. नेर येथे बैलगाडीतून आदित्य ठाकरे यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दारव्हा येथे विजय संकल्प सभा घेण्यात आली. या यात्रेमध्ये महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

महापोर्टलच्या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, लोडशेडिंगमुळे महापोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अडचण येत असेल तर ऑफलाइन अर्ज स्वीकारायला हवेत. नाहीतर ग्रामीण भाग भारनियमनमुक्त करून ऑनलाइन पद्धती सुरू ठेवावी. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: