शिवसेना प्रवेशासाठी आमदार दिलीप सोपल यांनी दिला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा

ग्लोबल न्युज मराठी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल हे बुधवार दि. 28 ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दिनांक 27 रोजी आ दिलीप सोपल यांनी त्यांच्या विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे औरंगाबाद येथे सोपवला आहे. यावेळी शिवसेना नेते उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

दिलीप सोपल निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस होती. त्यानुसार काल त्यांनी बार्शीत शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत सेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून दिलीप सोपल यांना ओळखलं जातं. आघाडी सरकारमध्ये त्यांनी विविध मंत्रीपदांवर काम केले आहे. गेल्या महिनाभरापासून सोपल शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती.त्याला आज पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान आमदार सोपल यांनी आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: