वैराग तालुका निर्मितीला विरोध करणाऱ्या माजी लोकप्रतिनिधींना पराभूत करा – राजेंद्र राऊत


मालवंडी — वैराग तालुका निर्मितीला विरोध करणाऱ्या माजी लोकप्रतिनिधींना पराभूत करा — राजेंद्र राऊत*

आपल्या सर्वांचे दैवत असलेले कै. आदरणीय चंद्रकांत नाना निंबाळकर यांचे वैराग तालुका निर्मितीचे स्वप्न होते. त्यांचे व वैराग भागातील जनतेचा जिव्हाळ्याचा विषय असलेला  वैराग तालुका निर्माण  केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.ज्यावेळेस महाराष्ट्रत तालुका निर्मितीची प्रक्रिया सुरू होती त्या वेळेस तालुक्यातील या  वाईट प्रवृत्तीच्या विरोधकांनी जाणून-बुजून वैराग तालुका निर्मितीला विरोध केला.या विरोधाचा साक्षीदार संपूर्ण बार्शी तालुका व वैराग भाग आहे. आदरणीय कै.नानांचे व तुमचे स्वप्न या विरोधकांनी पूर्ण होऊ दिले नाही.अशी टीका अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केली.

यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते सुभाष आण्णा डुरे पाटील, नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, संतोष दादा निंबाळकर,डॉ. कपिल कोरके,बाबा काटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी मालवंडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मालवंडी येथील जाहीर सभेत बोलताना राजेंद्र राऊत म्हणाले की, वैराग भागाची प्रगती होऊ द्यायची नाही, जेणेकरून वैराग भागातील जनता ही आर्थिक सक्षम न राहता गरिबीत राहिली पाहिजे. याच उद्देशाने या वाईट प्रवृत्तीच्या विरोधकांनी तालुक्यात सतत काम केले. जनतेची आर्थिक प्रगती झाली तर ते आपल्या जवळ राहणार नाहीत या विचाराने काम करून त्यांनी जनतेची आर्थिक प्रगती खुंटविली व अनेक कुटुंबे लयास लावून वेठीस धरली.

   विरोधकांच्या याच प्रवृत्तीने वैरागचा संतनाथ साखर कारखाना बंद पाडला व अनेक कुटुंबे उध्वस्त करून त्यांना देशोधडीला लावले. कुटुंबातील अनेक व्यक्तींनी आत्महत्या केल्या.या पापाचे धनी असलेल्या विरोधकांना या निवडणुकीत धडा शिकवून त्यांना कायमचे घरी बसवायचे काम आपण सर्वांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. 

   वैराग भागातील जनता ही चळवळीत काम केलेली आहे. त्यांना नेहमी वाईट प्रवृत्तीच्या लोकांशी संघर्ष करावा लागला. परंतु आता भविष्यकाळात आपल्या संघर्षाचे दिवस संपणार असून मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन वर्षात काम करत असताना बार्शी तालुका विकासाच्या प्रगतीपथावर नेण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी तालुक्यासाठी मंजूर केला.

   मला वैराग भागातील शेतकरी आर्थिक सक्षम बनवून स्वाभिमानी बनवायचा आहे. मला तुम्हां सगळ्यांना सोबत घेऊन आपल्या तालुक्यात हरितक्रांती करावयाची आहे.यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यन्त प्रयत्न करून लढत राहणार आहे. मला खात्री आहे की वैराग भागातील जनता व संपूर्ण बार्शी तालुका मला आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

   आदरणीय कै. चंद्रकांत नानांचे स्वप्न पूर्ण होऊ न देणाऱ्या,वैराग भागाला व बार्शी तालुक्याला नेहमी वेठीस धरून राजकारण करणा-या विरोधकांना व त्यांच्यात नव्याने हजेरीवर काम करणाऱ्या टोळीला या तालुक्यातून हद्दपार करण्याची वेळ आता आपल्या सर्वांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी मिळून त्यांचा अशाप्रकारे जास्तीत जास्त मताधिक्याने पराभव करावयाचा आहे की इथून पुढे त्यांची निवडणूक लढविण्याची तलफ सुद्धा झाली नाही पाहिजे.

   यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते सुभाष आण्णा डुरे पाटील, नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, संतोष दादा निंबाळकर,डॉ. कपिल कोरके,बाबा काटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी मालवंडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: