वैरागचा विकास करण्याचे काम दिलीप सोपलच करू शकतात- मकरंद निंबाळकर

वैराग : माजी आमदार व या भागाचे नेते स्वर्गीय चंद्रकांत निंबाळकर यांच्या गटाला मी त्यांचा पुतण्या असताना सुद्धा आमदार दिलीप सोपल यांनीच मला विविध पदे देवून न्याय दिला असून दुसरीकडे राऊत गटाने मात्र त्यांच्या मुलाचा व चंद्रकांत निंबाळकर यांच्या नावाचा नुसता वापर करून घेतला आहे त्यामुळे मी दिलीप सोपल यांचे नेतृत्वाखाली काम केले आहे आणि पुढे ही करणार असल्याचे प्रतिपादन जि .प .चे माजी सभापती मकरंद निंबाळकर यांनी केले .

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषडेच्या आरोग्य व शिक्षण समितीचे माजी सभापती मकरंद निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला याप्रसंगी आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते .विशेष म्हणजे निंबाळकर यांनी बार्शी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केली होती .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष त्र्यंबक कापसे होते .यावेळी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीर सोपल भाऊसाहेब आंधळकर, माजी सभापती युवराज काटे,मा.नगराध्यक्ष गणेश जाधव, सुभाष शेळके,श्रीमंत थोरात, अरुण सावंत, देवा दिंडोरे, संतोष गणेचारी, प्रविण काकडे, मा.सरपंच रावसाहेब निंबाळकर,वाहिद शेख, अशोक काशिद, रामभाऊ चव्हाण, सुधीर काळे, उमेश क्षीरसागर , सुधाकर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी अहमद शेख, दिपक खेंदाड,बाबा शेख, सोमनाथ आळे, विशाल बागवान, अनंत शिंनगारे, पिंटू भोसले, किरण पाटील, किशोर सोनवणे, राहूल कदम, योगेश जाधव आदींसह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्शी नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अँड. विकास जाधव यांनी मानले .

ग्लोबल न्युज नेटवर्क: