विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राज्यात रथ यात्रा काढणार,खबर जगाची

वृत्तसंकलन: गुरुराज माशाळ

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निती आयोग आयोजित सत्रात उपस्थिती लावली; बैठकीला ४० हून अधिक अर्थतज्ज्ञ उपस्थित होते.

नवी दिल्ली : सिगारेटप्रमाणे साखर, मीठ, मैद्याच्या पाकिटावरही सावधानतेचा इशारा छापणं बंधनकारक, लवकरच नियमांची अंमलबजावणी.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अर्थतज्ञ, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा; अर्थमंत्री निर्मला सीतारमण 5 जुलै रोजी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार.

WorldCup2019 भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना, भारताचा अफगाणिस्तानवर 11 धावांनी संघर्षपूर्ण विजय, मोहम्मद शमीने घेतला हॅटट्रीक बळी.

उत्तराखंड: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली युथ फाऊंडेशनच्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांची भेट.

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रथ यात्रा काढणार असल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; प्रत्येक मतदार संघाला देणार भेट,अब की बार 220 पार अशी रथ यात्रेची घोषणा असणार.

मुंबई: मुख्यमंत्री भाजपचाच होणार, गिरीष महाजन यांचं वक्तव्य; मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे; उद्धव ठाकरेंचं गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर.

मुंबई : सचिन तेंडुलकरला मुंबई महापालिकेकडून जाहीर झालेला नागरी सत्कार रद्द, 10 वर्षांपासून सचिनने कोणताही प्रतिसाद न दिल्याने प्रस्ताव रद्द करण्याची पालिकेवर नामुष्की.

मुंबई: लालबाग येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार बागवे आर्ट्सचे ज्येष्ठ मूर्तिकार शशिकांत बाळकृष्ण बागवे यांचे निधन.

पुणे: पुणेकरांची पावसाची प्रतिक्षा संपली. दोन दिवसात मान्सून पुण्यात दाखल होणार; पुणे हवामानशास्त्र विभागाचा अंदाज.

पुणे: आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २४ जूनला देहूतून प्रस्थान होणार आहे. त्यासाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी देहूत दाखल.

औरंगाबाद: टाटा ट्रस्टच्या सहकार्याने अत्याधुनिक पद्धतीने मोबाइल अॅपद्वारे राज्यात ई-पीक पाहणी केली जाणार; २७ हजार ७२० शेतकऱ्यांनी केली नोंदणी.

धिरज करळे: