वाढदिवस विशेष : राष्ट्रवादी काँग्रेस ला परमनंट आमदार देणारा ‘ हा ‘ युवक आहे राज्यात ही लोकप्रिय

स्वभाव हा राजकारणातील सर्वात महत्वाचा घटक आहे. सावध राजकारण जरुर असावे मात्र राजकीय व्यक्तीचा स्वभावच कार्यकर्ते आणि समर्थकांची घट्ट वीण जुळवत असतो.

कोणत्याही नेत्याच्या यशामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा असतो तो जिगरबाज समर्थकांचा कारण नेत्याचा ध्येय धोरणाचा झेंडा खांद्यावर घेवुन पक्षकार्याचा जयजयकार करण्याची जबाबदारी हि सर्वार्थाने असते ती कार्यकर्त्यांचीच अशा जिगरबाज कार्यकर्त्याचा संच व भावाप्रमाणे जीव लावणारे समर्थकांचे कुशल संघटक असणारे राष्ट्रवादीचे युवा नेते व संघर्षदायी नेतृत्व असणार्‍या जिल्हा परिषद सदस्य तथा लोकनेते शुगर अनगर चे चेअरमन बाळराजे पाटील यांचा आज वाढदिवस.

तालुक्याच्या विकासाची धुरा व पक्ष वाढीची मोठी जबाबदारी लहान वयात पडुनही लोकनेते बाबुराव आण्णा पाटील साखर कारखान्या सारख्या प्रगतीपथावरील संस्थेचे चेअरमनपद व जि.प सदस्य पद मोठ्या कुशलतेने बाळराजे भुषवत आहेत. वाढदिनी अभिष्टचितंन तर आहेत. मात्र त्यांच्या नेतृत्वगुणाबाबत व सदैव जमिनीवर पाय ठेवुन आकाशाला गवसणी घालणार्‍या कर्तुत्वाचा गौरवालेख आज त्या निमित्ताने मांडत आहोत.

बाळराजे पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीस जरी अनगरकर घराण्याच्या समृद्ध समाजसेवेचा वारसा लाभला आहे. तरीही आजोबा लोकनेते बाबुराव आण्णांकडुन नेतृत्व आजी लक्ष्मीबाई पाटील यांच्या कडुन दातृत्व वडील राजन पाटील यांच्या कर्तुत्व असे तिहेरी गुणांचे मोत्यांची देणगी राजेंना जन्मजातच मिळाली.

अत्यंत लहान वयात त्यांनी संघटन कौशल्याची चुणूक दाखवत युवकांच्या राजकारणात प्रभावी मुंसडी मारली. त्यांच्यावर पाटील कुटुंबीयाचे मार्गदर्शक शरदचंद्र पवार व पाटील कुटुंबीयाचे तारणहार अजितदादा पवार यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव असल्याने समाजसेवेतुन राजकारण हा वसा त्यांनी घेतला वडीलांच्या राजकारणाचा अभ्यास करणार्‍या बाळराजेंनी लोकनेते आण्णांचा करारी बाणा व आण्णांची माणसे जोडण्याची कला रक्तात कायम ठेवली.

त्यामुळे कार्यकर्त्यांना किती जरी बाळराजे जवळचे वाटत असले तरी कामचुकार कार्यकर्ते त्यांच्या नजरेला नजर आजही भिडवु शकत नाहीत हे सर्वश्रुत आहे. जीवनातील प्रत्येक राजकीय चढउताराचे अनुभव त्यांना असल्याने विजयाचा आनंद आणि पराभवाचे शक्य त्यांनी कधीच दाखवले नाही.

मात्र सामान्य कार्यकर्त्याची कामे केल्याचा अनंद व कार्यकर्त्याच्या सुख दु:खात धावुन जाण्याची स्वभावशैली आजही कायम ठेवली. बोलणे कमी मात्र संयमाने मने जिंकणे अन दररोज जीवाला जीव देणारे देणारे कार्यकर्ते जोडण्यात जणु त्यांचा हातखंडाच.

राजकीय कारकिर्दी बाबत बोलायचे झाले तर त्यांनी राजकीय पदार्पणातच लहान वयात राज्यात विक्रमी मतांनी जि.प सदस्य होण्याचा मान त्यांनी पटकविला. केवळ जि.प सदस्य नाही तर जि.प चे उपाध्यक्ष देखील सर्वात लहान वयात भुषवण्याचा सन्मान त्यांना खा. शरदचंद्र पवार अजितदादा यांच्या विशेष शिफारशीने मिळाला. जि.प चे शिक्षण व आरोग्य सभापती सोबत उपाध्यक्ष पदाची धुरा संभाळताना त्यांनी घेतलेले निर्णय आजही विद्यार्थ्यांच्या पालकांच्या व प्रामाणिकपणे काम करणार्‍या शिक्षक बांधवाच्या मनात कायम आहेत.

त्यानंतर लोकनेते सारख्या करखान्याच्या चेअरमन पदाची जबाबदारी संस्थापक आणि वडील राजन पाटील यांच्या वर सोपवली. गळीत हंगाम यशस्वी पार पाडणे वर्षभराचे वित्त नियोजन करणे सभासद ऊस उत्पादकांशी संपर्क ठेवुन त्यांच्या मनात कारखान्या बद्दल आपुलकी निर्माण करणे मोठे आव्हानच त्यांच्यापुढे होते.

यामध्ये त्यांना गावागवातील लोकनेेते परिवारावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते यांची मोठी साथ मिळाली. त्यामुळेच सलग तीन गाळीत हंगाम यशस्वी करत अत्याधुनिक कार्यशैलीने करखाना प्रगतीच्या टप्प्यावर आणण्यामध्ये बाळराजे यांना मोठे यश मिळाले.

यापुर्वीच्या चालु गळीत हंगामात देखील लोकनेते करखान्यांना तालुक्यातील दिग्गज म्हणवुन घेणार्‍या कारखान्यांना गतीने मागे टाकत सात लाख मेट्रीक टन गळीत हंगामाचा टप्पा यशस्वी केला. सध्या तालुक्यातील इतर कारखान्याची अवस्था काय आहे आणि लोकनेते सारख्या प्रगतीपथावरील कारखान्याची सद्यस्थिती काय आहे हे कोणा ज्योतिषाने सांगायची गरज नाही.

तालुक्यातील सर्व पक्षिय विरोधक संघटना यांनी दराचा मुद्दा पुढे करत लोकनेते कारखान्याला लक्ष्य केले. यामध्ये देखील पक्षिय राजकारण आहे हि बाब ओळखुन बाळराजे यांनी मोठ्या संयामाने व शांततेने अंदोलन काळातही कारखाना मोठ्या जोमाने चालवला.

खरं तर ही त्यांच्या कर्तव्यपुर्तीची व संयमाची परिक्षा होती. त्यामुळे कुशल व्यवस्थापण कौशल्याची चुणुक त्यांनी दाखवत ते संस्थापक राजन पाटील व सभासदांच्या शाबासकिस ते पात्र ठरले. गेल्या काही वर्षापासुन बाळराजे पाटील यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील संपर्क मोठ्या प्रभावात वाढवला आहे.

बाळराजे पाटील यांनी आपले लहान बंधू अजिंक्यराणा यांच्यासमवेत तालुक्यात गाव अन गाव पिंजून काढत राजन पाटील यांचे नेतृत्वाखाली यशवंत माने यांच्या सारख्या नवख्या उमेदवारास आमदार पद बहाल केले ही राजकारणातील विजयाची परंपरा सुरू ठेवण्यामध्ये त्यांना यश मिळालं.

यापुढील काळातील आमदार देखील राष्ट्रवादीचा व राजन पाटील यांच्याच विचाराचा व्हावा या साठी त्यांनी भिष्म प्रतिज्ञा केल्याचे जाणवत आहे. उत्तर सोलापुर व पंढरपुर या दोन्ही तालुक्यातील गावे मोहोळ मतदारसंघात येतात. त्या गावतही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

काहीही झाले तरी सामान्य जनतेच्या सुख दु:खात सहभागी होणाराच खरानेता त्या मुळे प्रत्येक ठिकाणी ते जावुन ते सुख दु:खात सहभागी होत आहेत. या लग्नसराई मध्ये शेकडो लग्न समारंभाना भेटी देवुन प्रत्येकाच्या कुटुंबाशी अपुलकीचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न बाळराजेंनी केला आहे.

माझा त्यांच्याशी कोणताही राजकीय संबंध नाही. गेल्या वीस वर्षापासून ते माझे आणि मी त्यांचा एक चांगला मित्र म्हणून आमची जणु कृष्ण आणि सुदामा सारखी मैत्री आहे. केवळ मैत्री आहे म्हणून हा लेख लिहिण्याचा अट्टाहास..
आज त्यांच्या वाढदिनी त्यांचे मनःपूर्वक अभिष्टचिंतन…

ग्लोबल न्युज नेटवर्क: