लोकसभेत खडाजंगी ; अमित शहा आणि ओवेसी काय म्हणाले एकमेकांना,वाचा सविस्तर-

नवी दिल्ली । लोकसभेत सोमवारी राष्ट्रीय तपास संस्था (संशोधन) विधेयक 2019 पास झाले. यावरील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शाह आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यात वाकयुद्ध रंगले. खासदार ओवैसी गृहमंत्री शाहांना म्हणाले की, बोट दाखवू नका, मी घाबरत नाही. यावर शाह म्हणाले की, मी कुणाला घाबरवत नाहीये. तुमच्या मनातच भीती आहे, याला काही करू शकत नाही.

वास्तविक, एनआयए विधेयकावर चर्चेदरम्यान बागपतचे भाजप खासदार आणि माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह आपले मत मांडत होते. ते सांगत होते की, एका केसमध्ये हैदराबादच्या पोलीस आयुक्तांवर राजकीय पक्षातील एक नेते तपास बदलण्याचा दबाव टाकत होते. आयुक्तांना सांगण्यात आले की, जर तुम्ही असे केले नाही, तर बदली करण्यात येईल. ते म्हणाले की, ते त्या वेळी मुंबईचे आयुक्त होते, यामुळे या प्रकरणाची माहिती आहे.

खासदार सत्यपाल सिंह यांनी सर्व नोंदी सदनासमोर ठेवाव्यात- ओवैसी

यावर ओवैसी म्हणाले की, सत्यपाल सिंह यांनी याप्रकरणी सर्व नोंदी सदनासमोर ठेवल्या पाहिजेत. यावर अमित शाह म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे खासदार विरोधी पक्षाचे नेते मत मांडत असताना त्यांना टोकत नाहीत, यामुळे विरोधकांनीही असे वागले पाहिजे.

विरोधी खासदारांनी ऐकण्याची सवय लावावी- शाह

शाह यांनी ओवैसींकडे बोट दाखवत म्हटले की, विरोधी खासदारांनी ऐकण्याची सवय लावून घ्यावी. यावर ओवैसी यांनी विरोध व्यक्त करत अंगुलिनिर्देश न करण्यास सांगितले. ते म्हणाले की, मी घाबरणारा नाही. यावर शाह म्हणाले की, जर भीती तुमच्या मनातच आहे, तर यावर मी काही करू शकत नाही.

अमित शाह काही देव नाहीत- ओवैसी

सदनाबाहेर ओवैसी म्हणाले की, जो भाजपच्या निर्णयांचे समर्थन करत नाही, त्याला ते (भाजप नेते) अँटी नॅशनल म्हणतात. नॅशनल आणि अंटी नॅशनलची दुकान यांनी उघडली आहे काय? अमित शाह यांनी अंगुलिनिर्देश करत धमकी दिली. पण ते फक्त गृहमंत्री आहेत, काही देव नाहीत. त्यांनी आधी नियम वाचले पाहिजेत.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा


ग्लोबल न्युज नेटवर्क: