रेड्यामुखी वेद बोलविला, मुक्ताई च्या पालखी सोहळ्यात रेडा नतमस्तक,(व्हिडिओ)

रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला
हाच प्रत्यय मुक्ताई च्या पालखी सोहळ्यात रेडा नतमस्तक झाला
मोरगाव जवळील घटना

मुक्ताईनगर : आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाचे दर्शनाची तीव्र ओढ व उन पावसाची तमा न बाळगता दि 8 जून रोजी श्री संत मुक्ताई पालखी सोहळा हजारो वारकरी व भाविकांसह गेले 29 दिवसांपासून अखंड पायी चालत आहेत .

30 व्या दिवसाचा मुक्काम उस्मानाबाद जिल्ह्यातील आष्टा या गावी असल्याने गावाच्या दिशेने निघालेली पालखी मोरगाव जवळून जात असताना परिसरातील शेतात काही गुरे चरत होती . तर पालखी सोहळा टाळ मृदुन्ग व मुक्ताई च्या नामघोषात तल्लीन होत पुढे सरकत होता अचानक या गुरांमधील एक भारदस्त रेडा पालखीला नतमस्तक होत होता हे दृश्य पालखी सोहळ्यातील हजारो वारकरी व परिसरातील शेतकऱ्यांनी पाहिले .

पालखी सोहळा प्रमुख ह भ प रवींद्र हरणे महाराज यांनी लागलीच या रेड्याला पालखी जवळ आणण्यास सांगितले त्यानुसार एका शेतकऱ्याने रेड्याला रस्त्यावर आणत पालखी सोहळ्यातील आदीशक्ती मुक्ताई चे दर्शन दिले. तर रेड्यानेही पालखी समोर साष्ट्रांग दंडवत घातले या घटनेचा प्रत्यक्ष व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून मागील वर्षी शेगाव पालखी सोहळ्यात पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी चक्क हरण सामील झाले होते याची प्रचिती रेड्याने करून दिल्याने भक्तीचा लळा माणसाला च नाही तर प्राण्यांमध्येही दिसून येत आहे

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

<figure class="op-interactive">
  <iframe width="560" height="315" src="https://wp.me/aaTgei-sF"></iframe>
</figure>

तर संत ज्ञानेश्वरांनी रेड्या मुखी वेद वदविला होता याची प्रचिती मोरगाव जवळ हजारो वारकऱ्यांनी अनुभवली तर हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यातून अश्रू देखील तरळले .
प्रसंगी पालखी सोहळा प्रमुख ह भ प रवींद्र हरणे महाराज , ह भ प नितीनदास महाराज , सदाशिव पाटील , ज्ञानेश्वर हरणे , अजय तळेले यांनी रेड्याला पुष्पहार घालून शाल व श्रीफळ देत सन्मान केला .

ग्लोबल न्युज नेटवर्क: