राष्ट्रनिर्मितीसाठी आदर्श विद्यार्थी घडविणे काळाची गरज- डॉ. प्रतापसिंह पाटील

कळंब –आज देश घडवायचं असेल तर प्रत्येक गाव खेड्यातील विध्यार्थीं घडला पाहिजे. काळाची पाऊले ओळखून भविष्यातील राष्ट्र उभारणीसाठी आजच्या बालकांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे विधार्थी घडला तरच देशाचं भविष्य उज्वल असणार आहे असे प्रतिपादन धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ प्रतापसिंह पाटील यांनी डिकसळ येथील श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर शाळेत स्व. गणपतराव कथले आघाडीच्या वतीने आयोजित बालदिनाच्या कार्यक्रम प्रसंगी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रतापसिंह पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बालरोगतज्ञ डॉ. रमेश जाधवर, संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत टेकाळे , स्व गणपतराव कथले युवक आघाडीचे सुमित बलदोटा, डॉ. गिरीश कुलकर्णी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड , प्राचार्य सतीश मातने , पत्रकार बालाजी सुरवसे , यश सुराणा , अशोक सोन्ने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत टेकाळे यांनी केले. यावेळी बाल दिनानिमित्त स्व गणपतराव कथले युवक आघाडीच्या वतीने शाळेस ३२ इंची एलईडी तर स्व चांदमलजी बागमार यांच्या स्मरणार्थ सुमित बलदोटा यांनी ऑल इन वन साऊंड सिस्टीम शाळेस भेट देण्यात आली. यावेळी डॉ रमेश जाधवर यांनी बोलताना सांगितले कि,कथेले आघाडीच्या विविध उपक्रमांमुळे अनेक गरजूना मदत झाली आहे. आघाडीच्या कामाची प्रेरणा इतरांनी घेऊन सामाजिक काम केले पाहिजे. समाजाच्या हिताची कामे केल्याने समाज उभा राहतो . तर सुमित बलदोटा यांनी बोलताना सांगितले कि आज गावात जेवढे मंPदिर महत्वाची आहेत तेवढीच गावची शाळा उभा राहिली पाहिजे विध्यार्थी घडला तरच देश घडू शकतो आणि त्या कार्यात आम्ही खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्त्न करत आहोत. तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड व डॉ. गिरीश कुलकर्णी यांनीही कथले आघाडीच्या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक निकम पोपट , सहशिक्षक प्रदिप यादव , किशोर वाघमारे ,सज्जन बर्डे , रमेश अंबिरकर ,नामदेव झाडे , सुरज राऊत , श्रीमिष्टा पवार व विद्यार्थ्यानी विशेष परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे सुञसंचलन सहशिक्षक किशोर वाघमारे यांनीे केले तर नामदेव झाडे यांनी आभार मानले .

भारत देश महासत्ता बनविण्यासाठी ग्रामीण भागातील शाळा सुसज्ज झाल्या पाहिजेत.फक्त शाळेत भौतिक सुविधा आल्या म्हणजे शाळेची प्रगती झाली असे नाही तर शाळेतील शिक्षक व विद्यार्थी गुणवान झाले पाहिजेत व विद्यार्थ्यांना कौशल्य निर्माण करणारे शिक्षण दिले पाहिजे.बालदिन कसा साजरा करावा याचे उत्तम उदाहरण स्व.गणपतराव कथले युवक आघाडीने घालून दिले आहे

डॉ.प्रतापसिंह पाटील

अध्यक्ष धनेश्वरी शिक्षण समूह महाराष्ट्र,छत्तीसगड

ग्लोबल न्युज नेटवर्क: