राजेंद्र राऊत यांनी दिला भाजपच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा, विधानसभेच्या आखाड्यात ट्रॅक्टर घेऊन उतरले

राजेंद्र राऊत यांनी दिला भाजपच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा, विधानसभेच्या आखाड्यात ट्रॅक्टर घेऊन उतरले

बार्शी: बार्शीतील भाजप नेते माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी भाजपच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे पाठवून दिला असल्याची माहिती राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की मी दि.1 ऑक्टोबर रोजी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला आहे. व त्यांनतर अपक्ष अर्ज भरला आहे. तर आज इमेल द्वारे प्रदेश भाजपकडे ही राजीनामा दिला आहे. या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीत काम केले आहे.

भविष्यात करणार आहे. परंतु २४६, बार्शी विधान सभेची जागा महायुती होऊन शिवसेनेकडे गेल्यामुळे मला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळू शकली नाही व माझे जीवनात मी माझे कायमचे विरोधक ज्यांच्या प्रवृत्तीला विरोध केला आहे, करतो आहे व आयुष्यभर करणार आहे. अशा व्यक्तीला महायुतीची (शिवसेनेची) उमेदवारी मिळाली आहे म्हणून तमाम बार्शीकर जनतेने मला पाठबळ व आशीर्वाद दिले आहे. बाशी तालुक्यातील वाईट प्रवृत्तीच्या
विरोधात लढण्यासाठी ताकद बार्शीच्या जनतेने मला दिली आहे.

माझ्या जीवात जीव आहे तो पर्यंत मी अशा वाईट प्रवृत्तीच्या विरोधात बार्शीमध्ये जनते करिता लढत
राहणार व त्यांची सेवा करणार आहे. म्हणून मी बार्शी विधान सभेची निवडणक बाशीतील तमाम जनतेच्या
आशीर्वादावर लढवत आहे. तरी माझ्यामुळे पक्षाची बदनामी होऊ नये, म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या
सदस्यत्वाचा माझा राजीनामा देत आहे.

काम करताना काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने क्षमा करावी व परत पक्षात काम करण्याची
संधी दिल्यास मी आपल्या मार्गदर्शनाखाली काम करेन, तरी माझा राजीनामा स्वीकारावा ही विनंती राऊत यांनी या राजीनामा पत्रात केली आहे.

बार्शीत शिवसेनेची उमेदवारी ही दिलीप सोपल यांना दिली आहे तर राजेंद्र राऊत यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून निरंजन भूमकर हे उभे आहेत.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: