रणवीर राऊत यांना दिव्य मराठीचा प्राऊड ऑफ महाराष्ट्राटीयन पुरस्कार प्रदान

बार्शी: बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राजेंद्र राऊत यांना दै.दिव्य मराठीचा प्राउड ऑफ महाराष्ट्रीयन 2019 हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे, सल्लागार संपादक यामाजी मालकर, सोलापूर आवृत्ती चे निवासी संपादक संजीव पिंपरकर,ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अनिल बोकील ,राज्य युनिट हेड संदीप बिष्णोई ,सोलापूर हेड नौशाद शेख आदि मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राजकारणा बरोबरच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी बार्शी नगरपालिकेचे गटनेते दिपक राऊत,पत्रकार चंद्रकांत करडे,सागर उमाटे,पप्पू टेकाळे,सुदीप पाटील व सामाजिक राजकिय क्षेत्रातील मान्यवर तसेच दै.दिव्य मराठीचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रणवीर राऊत हे विद्यार्थी दशेपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून ते तीन वेळ शिवाजी महाविद्यालय बार्शी चे यू आर होते .लक्ष्मी सोपान बाजार समितीचा ही कारभार त्यांनी सांभाळला आहे. सद्या ते बाजार समितीचे सभापती आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीत विकासकामांची घौड दौड सुरू आहे.

admin: