म्हणून धोनीने ठरवून सामना गमावला; युवराजसिंग च्या वडिलांचा आरोप

‼खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन‼

📝वृत्तसंकलन: गुरुराज माशाळ, दुधनी.

🛎नवी दिल्ली : तांत्रिक बिघाडामुळे या आठवड्यात ‘चांद्रयान-2’चे उड्डाण ‘इस्रो’ला रद्द करावे लागले होते. मात्र, आता पुढच्या आठवड्यात 21 किंवा 22 जुलैला ‘चांद्रयान-2’ अवकाशात झेपावू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे, मात्र इस्रो’ने अद्याप प्रक्षेपणाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.

🛎नवी दिल्ली : पाकिस्तानच्या सैन्य कोर्टाने हेरागिरीच्या आरोपांखाली फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) मोठा दिलासा दिला. कोर्टाचा निकाल भारताच्या बाजूने लागला असून कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.

🛎नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सत्य आणि न्यायाचाच विजय आहे. तथ्यांवरील विस्तृत अभ्यासावर आधारित निर्णयासाठी आयसीजेचे अभिनंदन – पंतप्रधान नरेंद्र मोदी

🛎नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांशी केली बातचीत, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णया बाबत आज राज्यसभेत निवेदन सादर करणार.

🛎नवी दिल्ली: कुख्यात दहशतवादी हाफिज सईद यास काल पाकिस्तानात अटक करण्यात आल्या नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील दोन वर्षात हाफीजला शोधण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानवर प्रचंड दबाव टाकला होता अशी प्रतिक्रिया ट्विटरवरून दिली आहे.

🛎नवी दिल्ली : कोहलीला वर्ल्ड कप विजयाचा मान मिळू नये म्हणून धोनीनं ठरवून सामना गमावला असल्याचे आरोप भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांचे वडील योगीराज यांनी केले आहे.

🛎उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात जमिनीच्या वादातून गोळीबार; गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहीती, जमिनीच्या वादावरुन झालेल्या या हिंसाचारामध्ये २५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.

🛎मुंबई : कुलभूषण जाधव यांच्या बाजूने आंतरराष्ट्रीय कोर्टात निकाल जाहीर झाल्यानंतर कुलभूषण जाधव यांच्या मित्र परिवाराने फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

🛎 मुंबई : पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर मोर्चा काढून शिवसेना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.

🛎गडचिरोली : जहाल नक्षलवादी नर्मदक्का आणि किरणकुमार यांना महाराष्ट्र पोलिसांनी केलेली अटक चुकीची असून त्यांना बिनशर्त सोडण्यात यावे अशी मागणी पश्चिम सब झोनल ब्युरो गडचिरोली दंडकारण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

🛎सांगली : महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर विश्वजीत कदम यांनी काल दिल्लीत जाऊन काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांची भेट घेतली.

🛎सोलापूर : सीना नदी पात्रातून वाळू चोरी करणाऱ्या वाळू माफियांवर जिल्हा पोलिस प्रशासनाच्या पथकाने कारवाई करुन तब्बल १८ लाख ९७ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केली; याप्रकरणी मोहोळ पोलिसांत ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🛎सोलापूर : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या तब्बल 746 शाळांनी वीज बिल न भरल्याने या शाळांतील वीज ‘महावितरण’कडून कपात करण्यात आली; वीज बिलासाठी जि.प. सेसफंडातून 70 लाखांच्या निधीची तरतूद करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: