मोदींचे ट्विटर फॉलोअर 5 कोटींच्या पार, फक्त हे 2 नेते आहेत मोदींच्या पुढे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेमध्ये जसे लोकप्रिय आहेत तसेच ते सोशल मीडियावर ही तेवढेच लोकप्रिय असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. फेसबुक प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवर अनेक जण फॉलो करतात. आता त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 5 कोटींच्या वर गेली आहे. गेल्या वर्षभरात मोदींचे 60 लाख फॉलोअर्स वाढले. यामुळेच ट्विटरवर सगळ्यात जास्त फॉलोअर्स असलेल्या नेत्यांमध्ये मोदींचा तिसरा क्रमांक झाला आहे.

सरकारचा एखादा निर्णय असो किंवा मोदींना भावलेली एखादी गोष्ट असो… त्यांचा ट्विटरवर संदेश देण्याचा वेग जास्त आहे. त्यामुळेच ट्विटरवर लोकप्रिय असलेल्या नेत्यांमध्ये मोदी आघाडीवर आहेत. नरेंद्र मोदींच्या पुढे बराक ओबामा आणि डॉनल्ड ट्रम्प हे नेते आहेत.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे 10 कोटी 80 लाख फॉलोअर्स आहेत तर डॉनल्ड ट्रम्प यांचे 6 कोटी 40 लाख फॉलोअर्स आहेत. डॉनल्ड ट्रम्प यांनी अजूनही बराक ओबामांना मागे टाकलेलं नाही हेही यावरून दिसतं.

भारतात मोदींचाच नंबर

भारताच्याच बाबतीत बोलायचं झालं तर नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत. त्यांच्यानंतर अरविंद केजरीवाल, अमित शहा आणि राजनाथ सिंह यांचा क्रमांक लागतो आणि पाचव्या क्रमांकावर राहुल गांधी आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक अकाउंटवर 5 लाख फॉलोअर्स आहेत. त्यांच्याच कार्यकाळात बनलेल्या पंतप्रधान कार्यालयाच्या अकाउंटचे 3 लाख फॉलोअर्स आहेत. त्यामुळेच मोदी आता ट्विटरवर लोकप्रिय असणाऱ्या पहिल्या 20 जणांमध्ये पोहोचले आहेत.

फॉलोअर्सच्या बाबतीत भारतात हे 5 जण आघाडीवर

  1. नरेंद्र मोदी – 5 कोटी
  2. अरविंद केजरीवाल – 1.54 कोटी
  3. अमित शाह – 1.52 कोटी
  4. राजनाथ सिंह – 1.41 कोटी
  5. राहुल गांधी – 1.06 कोटी

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: