मैत्री जपणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांनी अशा दिल्या शुभेच्छा

मैत्री जपणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांनी अशा दिल्या शुभेच्छा

राज्यात कोरोनाचे संकट गहिरे होता असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा तसे आदेश दिले आहे. ‘मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत’, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अस संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सुद्धा राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बाळा नांदगावकर यांनी “सुदामाचे राजधन” असे नाव देत आपल्या भावना प्रकट केल्या आहेत.

व्यंगचित्र, राजकारणाबरोबर राज ठाकरेंना चित्रपट आणि फोटोग्राफी या क्षेत्राचीही विशेष आवड आहे. राज यांना चित्रपट पाहायला आवडतात. मराठी चित्रपट सृष्टीबरोबर बॉलिवूडमध्येही त्यांचे उत्तम संबंध आहे. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे सख्खे भाऊ. संगीत क्षेत्राची आवड असलेल्या श्रीकांत ठाकरे संगीतकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. मार्मिकच्या उभारणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: