मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका, खटला चालवण्याचे आदेश

 मुंबई । विधानसभा निवडणुका तोंडावर असताना सर्वोच्च न्यायालयाने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का दिला आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर होता.

याबाबत  खटला चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती लपविल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द करावी, या मागणीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय निर्णय दिला आहे.

अॅड. सतीश उके यांनी ही याचिका दाखल केली होती. यापूर्वी त्यांनी मुंबई हायकोर्टात ही याचिका दाखल केली होती, मात्र ती फेटाळून लावण्यात आली होती.  दरम्यान, उके यांची याचिका दाखल करून घ्यायची की नाही याची विचारणा करणारी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीस यांना काही महिन्यांपूर्वी पाठवली होती. याच प्रकरणात उच्च न्यायालयाने फडणवीस यांना आधीच दिलासा मिळाला होता.

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्र दाखल करताना फडणवीस यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या 2 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली आहे. यानंतर सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर आज सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता व न्या. अनिरुद्ध बोस यांच्या खंठपीठानं निकाल दिला. 

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: