मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, बार्शीसाठी सव्वा नऊ कोटीचा निधी मंजूर- राजेंद्र राऊत

प्रशांत खराडे

बार्शी: तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सन 2019-20 या वर्षामध्ये बॅच 2 अंतर्गत 9 कोटी 24 लाख 19 हजार रूपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती भाजप नेते माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली.

बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते खराब झाल्यामुळे त्या भागातील नागरिकांची सतत गैरसोय होत आहे. या रस्ता दुरुस्ती व रस्ते पक्के करण्याकरीता शासनाच्या विविध योजनांमधून बार्शी तालुक्याकरिता सतत निधी उपलब्ध केला आहे. यापूर्वीही ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी भाजप सरकारच्या माध्यमातून उपलब्ध केला आहे. जेणेकरून पक्के रस्ते झाल्यानंतर दळणवळण चांगले होण्यास मदत होईल .

या रस्त्यांसाठी निधी मंजूर

घारी ते पाथरी 2.45 कि.मी.1कोटी 91लाख 51हजार रुपये,
बोरगांव फाटा ते बोरगांव खु या 1.90 कि.मी.साठी 1 कोटी 90 लाख रुपये.
कारी ते नारीवाडी या 4.95 कि.मी.रस्ता साठी 4 कोटी 20 लाख 13 हजार रुपये.
सर्जापूर फाटा ते सर्जापूर या 1.25 कि.मी.रस्ता साठी 93 लाख 4 हजार रुपये याप्रमाणे चार रस्त्यांकरिता एकुण 9 कोटी 24 लाख 19 हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे राऊत यांनी सांगितले.

बार्शी तालुक्यातील रस्त्यांकरिता एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे त्यांनी तालुक्याच्या वतीने आभार मानले आहेत.

धिरज करळे: