महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी या उच्च शिक्षित महिलेची नियुक्ती

सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष मंगळवेढा नगरपालिकेच्या नगरसेविका अनिता नागणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी च्या महिला जिल्हाध्यक्ष बार्शी च्या मंदाताई काळे या आमदार दिलीप सोपल यांच्या सोबत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांना या पदावरून मुक्त करण्यात आले. त्या जागी नागणे यांची नियुक्ती महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

या नियुक्ती चे पत्र शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील , खासदार सुप्रिया ताई सुळे, जेष्ठ नेत्या महिला आघाडीच्या राष्टीय अध्यक्षा फौजीया खान ,माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील, अमोलजी मिटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.

या निवडीबद्दल शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार मानत येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यात पक्षाच्या वाढीसोबतच महिलांच्या प्रश्नाला पक्षाच्या माध्यमातून व्यासपीठ देऊन सर्व नेते मंडळींच्या व सहकार्यांच्या माध्यमातून ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. या सर्व कामात मला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन अनिता नागणे यांनी केले आहे.

अनिता नागणे या उच्च शिक्षित असून त्या कायद्याच्या पदवीधर ही आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या महिलांसाठी काम करत आहेत. त्यांना माहेरचा राजकीय वारसा ही लाभलेला आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: