मला तुमच्याशी मनमोकळा संवाद साधायचाय;आमदार राणा पाटलांचे भावनिक आवाहन,शनिवारी होणार राजकीय निर्णय?

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून मोठ्या प्रमाणावर नेते पक्षांतर करून शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यामध्ये मातब्बर नेत्यांचा समावेश आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि पवारांचे जवळचे नातेवाईक माजी मंत्री डॉ पद्मसिंह पाटील व त्यांचे चिरंजीव माजी राज्यमंत्री आमदार राणाजजितसिंह पाटील हे पिता पुत्र गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पासून फटकून वागत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर आम. राणा पाटील पुढील निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा शनिवारी आयोजित केला आहे. या मेळाव्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून हा मेळावा उस्मानाबाद जिल्ह्याचे राजकीय भवितव्य ठरवणारा असणार हे मात्र नक्की.


राष्ट्रवादी च्या शिवस्वराज्य यात्रेपासून ही ते लांब राहिले आहेत. परवा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती.

त्यामुळे राणा पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा केल्या काही दिवसापासून सुरू आहे. मात्र त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर केलेली नाही. या पार्श्वभूमीवर आ.राणा पाटील यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंट वर पोस्ट प्रसिध्द करत आपल्यासोबत मला बोलायचे आहे.. मनमोकळा संवाद साधायचा आहे आपण माझ्या जिवाभावाची माणसे आहात.आजवर तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत.. आपल्या अंगाखांद्यावर खेळून मी लहानाचा मोठा झालो आहे..उस्मानाबाद जिल्ह्याचा निरंतर विकास साधण्यासाठी काही निर्णय घेणे अपेक्षित आहे.. त्यासाठी संवाद साधणे गरजेचे आहे.. यासाठी दिनांक 31 रोजी उस्मानाबाद च्या लेडीज क्लब च्या मैदानावर मेळावा आयोजित केला आहे.. या मेळाव्यात राणा पाटील पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय जाहीर करतील अशी शक्यता आहे.

राणाजगजितसिंह पाटील यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

आपल्यासोबत मला मनातलं बोलायचं आहे…
अगदी मनमोकळा संवाद साधायचा आहे…तुम्हीच माझ्या जिवाभावाची माणसं आहात. प्रत्येक टप्प्यावर आदरणीय डॉक्टर पदमसिंह पाटील साहेबांपासून ते आजवर मोठ्या धीरानं तुम्ही सगळेजण खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आहात.

आपल्या कौटुंबिक नात्याचे ऋणानुबंध ४० वर्षांपासून घट्ट आहेत.. जिल्ह्याच्या विकासासाठी डॉक्टर साहेबांनी घेतलेले कष्ट, त्यासाठी त्यांना अनेक संघर्षाला सामोरे जावे लागले, प्रवास चढ-उताराचा होता, पण त्यांच्या कामाची तळमळ पाहून आपण सगळेजण एखाद्या पर्वताप्रमाणे साहेबांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिलात. त्यांना कायम साथ दिली. या सगळ्या कौटुंबिक स्नेहाची शिदोरी माझ्यासाठी अनमोल आहे. तुम्हा सर्वांच्या रूपाने लाभलेल्या या विस्तारित परिवाराची जबाबदारी माझ्यावर आहे. याची मला सदैव जाणीव आहे.

आपल्या सर्वांच्या समोर मी लहाणाचा मोठा झालो आहे. आपल्यापैकी अनेकांच्या अंगाखांद्यावर खेळलो आहे. आपण लहाणाचे मोठे होताना मला पाहिलं आहे. शुद्ध अंत:करणाने प्रामाणिकपणे केलेल्या कामास आपला जो सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे त्यातूनच प्रगतीचा हा प्रवाह आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथवर आला आहे.

आदरणीय डॉक्टर साहेबांच्या प्रत्येक शब्दाला आपण काळजाच्या आत जपून ठेवलं आहे. साहेबांनीदेखील कधीच अंतर दिले नाही. जशी साथ आपण सर्वांनी साहेबांना दिलीत, तशीच नव्हे तर त्याहीपेक्षा अधिक घट्ट सोबत मलाही लाभली आहे. एकजुटीने, एकदिलाने आपण संघर्ष केला, विकासासाठी आंदोलने केली, एकमेकांच्या सहकार्याने आणि संवादाने सर्व अडचणींचा सामना केला,अविरत कष्ट केले आणि जिल्ह्याच्या शाश्वत परिवर्तनासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.

आजवर जी मायेची ऊब आणि सक्षम साथ आपण सर्वांनी दिली, यापुढेही ती अशीच राहील असा माझा दृढ विश्वास आहे. हाच विश्वास मला प्रत्येक वेळी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देतो, प्रामाणिक कामासाठी जे कठीण निर्णय घ्यावे लागतात त्यासाठी मोठे बळ देतो !!!

आजवर आपण मला जी ताकद दिली, जो विश्वास दाखविला, जे प्रेम दिले त्याविषयी आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला शब्द अपुरे आहेत. जिव्हाळ्याचे ऋणानुबंध शब्दांच्या पलीकडले असतात. आपल्यातील ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी आणि आपल्या कौटुंबिक नात्यातील उत्साह अधिक सक्षम करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित भेटू या..

बदलत्या नैसर्गिक, भौगोलिक व राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प,रोजगार निर्मितीसाठी कौडगाव औद्योगिक वसाहतीत उद्योग उभे करणे या प्रमुख प्रश्नांसह जिल्ह्याच्या निरंतर विकासासाठी काही निर्णय घेणे अपेक्षित असून याबाबत आपल्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. या कौटुंबिक संवाद सोहोळ्यासाठी मी आपणा सर्वांना जिव्हाळ्याच्या हक्काने प्रेमपूर्वक निमंत्रण देतो !

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: