मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम परिसरात जॅमर बसवा, कॉंग्रेसची मागणी

मुंबई । विधानसभा निवडणूकीसाठी मतदान किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडले. आता सगळ्यांना वेध लागले आहेत ते निकालाचे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत.

निवडणूक निकालांचे विविध चॅनेल्सवर आलेले एक्झिट पोलवरुन राज्यात पुन्हा एकदा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. महायुतीला २०० च्यावर जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र या वातावरणात ईव्हीएम मशीन टँपरींग होऊ शकते त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर मतांची आकडेवारी तात्काळ जाहीर करावी व त्यानंतरच पुढच्या फेरीची मोजणी करावी. व्हीहीपॅटच्या मोजणीसाठी मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना द्यावी असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: