भैरवनाथ शुगर्स च्या वतीने आर्यन शुगर्स चालविणेस घेणार – तानाजीराव सावंत

भैरवनाथ शुगर्स च्या वतीने आर्यन शुगर्स चालविणेस घेणार – तानाजीराव सावंत

सोलापूर – बार्शी तालुक्यातील आर्यन शुगर्स हा सद्या डी.सी.सी. बँकेच्या ताब्यात असणारा
कारखाना भैरवनाथ शुगर्स च्या वतीने चालवणेस घेऊन बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना
दिलासा देणार असल्याचे राज्याचे जलसंधारण मंत्री तथा भैरवनाथ शुगर्स चे प्रमुख ना.प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगीतले आहे.

ना. सावंत यांनी पुढे म्हटले आहे की, आर्यन शुगर्स ह्या कारखान्याच्या २०१४ पूर्वीरितसर भोसले – नलवडे यांच्या कुमदा शुगर्स कडे हस्तांतरण झालेनंतर २०१४ ला भोसले – नलवडे यांनी साखरआयुक्ता कडून गाळप परवाना घेऊन गळीत हंगाम चालवला मात्र तदनंतर
शेतकऱ्यांची देणी, कारखान्यातील कर्ज, एफ.आर.पी. संदर्भाने कारखान्यावर कारवाई झाली.

सदर डी.सी.सी. बँकेच्या ताब्यात असणारा कारखाना भैरवनाथ शुगर्स कडून चालवविणे घेणेसाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. लवकरच या संदर्भात बँक व्यवस्थापनाशी चर्चा करुन पुढील पावले उचलली जातील.

सदर कारखान्याकडे थकित असणारी शेतकऱ्यांची देणी, एफ.आर.पी. आदी संदर्भाने सकारात्मक दिलासादायक भुमिका घेतली जाईल. भैरवनाथ शुगर्स च्या वतीने साखर कारखानदारातील यशस्वी प्रवासानंतर आर्यन शुगर्स हा कारखाना चालवुन बार्शी
तालुक्यातील आणि परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करु असेही ना. सावंत यांनी म्हटले आहे.

नुकताच आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच आर्यन शुगर च्या भोसले-नलावडे यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या उसाची बील देणे बाकी राहिली आहेत. तो मुद्दा सोपल याना अडचणीचा आणि त्रासदायक ठरत होता त्या पार्श्वभूमीवर हा कारखाना चालविण्यासाठी सावंत यांनी पुढे येणे याला महत्त्व आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: