भारत वेस्ट इंडिज टी 20 मालिका रोमहर्षक होणार युवा खेळाडूंना छाप पाडण्याची सुवर्णसंधी

युवराज ढगे

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरवात T-20 द्वारे
अमेरिकेतील फ्लोरिडा भागात करीत आहे टि-20 प्रकारात कॅरेबियन संघ बलाढ्य मानला जातो.

भारतीय संघही तिन्ही प्रकारात बलाढ्य असला तरी टि-20 मध्ये धक्का देण्याची क्षमता सध्याच्या टि-20 चॅम्पियन वेस्ट इंडिज संघात आहे.
भारतीय संघात भूगनेश्व़र व जडेजा वगळता कमी अनुभवी गोलंदाज आहेत त्यामुळे टि-20 प्रकारात कॅरेबियन फलंदाजांना आवरणे एक प्रकारचं आव्हान भारतीय गोलंदाजी पुढे आहे.

विश्वचषकानंतर प्रत्येक संघ पुनरबांधणीच्या प्रक्रियेतून जात आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना जास्त संधी मिळणार आहे त्यातच त्यांना संघात स्थान निर्माण करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे वेस्टइंडिज दौऱ्यातील आव्हानंमधून कोन यशस्वी होत संघात स्थान निर्माण करतात हे पाहणे गरजेचं आहे. श्रेयस अय्यर ,मनीष पांडे, ऋषभ पंत,चहर बंधू, कुणाल पंड्या ,नवदीप सैनी , सुंदर, खलील अहमद या युवा खेळाडूंना संघात स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी असेल. पुढील वर्षी ऑक्टोबर मध्ये टि-20 चा विश्वचषक आहे त्यादृष्टीने संघ बांधणीत या युवा खेळाडूंची भूमिका महत्वाची असेल कारण २००७च्या विश्वविजेते पदानंतर या प्रकारात भारतीय संघाला विशेष काही करता आलेले नाही.

अष्टपैलू सुनिल नारायण , आंद्रे रसेल यांच्या पुनरागमनाने कॅरेबियन संघ आणखीन मजबूत झाला आहे. त्यांचा कर्णधार ब्रेथवेट पण एक आक्रमक अष्टपैलू आहे तो संघाच्या गरजेच्या वेळी हमखास मोठी खेळतो तसेच पुरन , लुईस , हेटमायर सारखे धोकादायक फलंदाज केंव्हाही समोरच्या संघाच्या गोलंदाजाच्या चिंधड्या उडवू शकतात. थॉमस च्या नेतृत्वाखालील काँट्रेल , पॉल ,पोवेल यांचा भेदक मारा युवा भारतीय फलंदाजांसमोरील आव्हान असेल. तसेच भुगनेश्व़र च्या नेतृत्वाखाली युवा गोलंदाज खलील अहमद , सैनी , दिपक चहर यांचा मारा नक्कीच भेदक होईल व बुमराह , शमी यांची कमी भासणार नाही अशी आशा समस्त भारतवासीयांना आहे.

राहुल , अय्यर , मनीष पांडे यापैकी कोणाला संधी मिळते हे पण पाहावे लागेल. अष्टपैलू जडेजा व कुणाल पांड्या यांचे संघातील स्थान पक्के मानले जातेय. शिखर दुखापतीतुन सावरून परतलाय तो ताजातवाना वाटतोय व आक्रमक सुरवात करून देण्यासाठी सज्ज झालाय.

दोन्ही संघात अनभूवी व युवा खेळाडूंचे चांगले मिश्रण पाहायला मिळतेय त्यामुळे टी-20 मालिका रोमहर्षक होईल व चाहत्यांचे चांगल्या प्रकारचे मनोरंजन होईल व युवा खेळाडूंनी या मालिकेत छाप सोडवी हीच आशा.

भारतीयसंघासमनःपूर्वक_शुभेच्छा

admin: