तेलंगणा : विकाराबाद येथे ट्रेनर विमान क्रॅश, दोन वैमानिकांचा मृत्यू

नवी दिल्ली | रविवारी एक विमान अपघात झाला. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्याच्या सुल्तानपूरमध्ये हा अपघात झाला. हे एक ट्रेनर विमान असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच येथे टीम पोहोचली आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.

एका वैमानिकाचे नाव प्रकाश विशाल असल्याचे बोलले जात आहे. तर एक महिला वैमानिकाचा यामध्ये मृत्यू झाला. त्यांची ओळख अजून पटलेली नाही. विशाल ट्रेनी पायलट होते. ट्रेनर विमान विकाराबाद जिल्ह्याच्या सुल्तानपूर गावावरुन जात होते तेव्हा हा अपघात झाला. या गावामधील शेतामध्ये हे विमान कोसळले. विमान कोसळल्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ या ठिकाणी पोहोचले त्यांनी तात्काळ पोलिसांना याविषयी माहिती दिली.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: