भारतातील विविध सैन्यदलाच्या 98 अधिकाऱ्यांचे कम्प्यूटर हॅक;खबर जगाची

वृत्तसंकलन: गुरुराज माशाळ

नवी दिल्ली : भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घेतली ज्येष्ठ भाजपा नेते मुरली मनोहर जोशी यांची भेट.

नवी दिल्ली : भारतातील विविध सैन्यदलाच्या 98 अधिकाऱ्यांचे कम्प्यूटर हॅक; हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून देशाच्या सुरक्षेसंबंधीची गोपनिय माहिती मिळवली असल्याचा धोका.

नवी दिल्ली – चंद्राबाबू नायडू यांना धक्का, टीडीपीचे चार राज्यसभा खासदार करणार भाजपामध्ये प्रवेश.

शिमला (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशमधील कुल्लू येथे बस दरीत कोसळून भीषण अपघात; या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला असून, 30 जण जखमी.

प.बंगाल : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार अद्यापही सुरु, हिंसाचारादरम्यान गोळीबार आणि बॉम्ब फेकण्यात आले. लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या सोडत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न.

मुंबई : महाराष्ट्रात सर्व बोर्डांच्या शाळेत मराठी शिकविणे हे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.

मुंबई : मुंबई : संख्यावाचन बाबत तज्ज्ञांची समिती नेमून विचार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितले.

मुंबई : मराठा आंदोलनादरम्यान तरूणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट.

मुंबई : विधानसभेत पाणी प्रश्न तापला, आपापल्या जिल्ह्यातील पाणी प्रश्नांवर नेते आक्रमक; पाणी नियोजनात सरकार अपयशी, अजित पवारांचा आरोप.

मुंबई : सैनिकांवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेत येण्यास परवानगी; सभापती निंबाळकर यांनी दिली परवानगी

पुणे : पुण्यात मॉल्समध्ये फ्री पार्किंग, महापालिकेच्या मॉल मल्टिप्लेक्सना सूचना; पुण्यात आजपासून सर्व मॉल्स आणि मल्टिप्लेक्समध्ये पार्किंग नि:शुल्क करण्याचा निर्णय.

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले सनातन संस्थेचा वकील अॅड. संजीव पुनाळेकरला पुणे येथील सत्र न्यायालयाने २३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

नांदेड : लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकारने कठोर 2 गरज, रामदेवबाबा यांची पत्रकार परिषदेत मागणी.

सोलापूर : राजेश कांबळे खून खटला लढवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष न्हावकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

धिरज करळे: