भाजपची सात जणांची चौथी यादी जाहीर, तावडे, मेहतांचा पत्ता कट, मुक्ताईनगर मधून यांना दिले तिकीट

विनोद तावडे, प्रकाश महेतांचा पत्ता कट, मुक्ताईनगरमधून खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी, भाजपची चौथी यादी जाहीर

मुंबई । मुंबई । भाजपची सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. मुक्ताईनगरमधून अखेर एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. बोरीवलीतून विनोद तावडेंच्या जागी सुनिल राणे आणि घाटकोपर पूर्वमधून प्रकाश मेहतांच्या जागी पराग शहांना तिकीट देण्यात आले आहे.

त्यामुळे विनोद तावडे आणि प्रकाश मेहतांचा पत्ता कट करण्यात आला आहे. दुसरीकडे मंत्री राहिलेल्या प्रकाश मेहता यांचा देखील पत्ता कट करण्यात आला असून त्यांच्या जागी पराग शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे अजूनही वेटिंगवर आहेत. कुलाबा मतदारसंघामधून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: