बार्शी च्या श्री भगवंत मल्टीस्टेट सोसायटीला फेडरेशन असोसिएशनचा ‘ सहकार गौरव’ पुरस्कार

बार्शी : येथील श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडीट को ऑफ

सोसायटीला फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को- ऑफ क्रेडिटसोसायटी च्या वतीने ११ ते २५ कोटी ठेवींच्या गटासाठी देण्यात येणारा विषेश सहकार गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यातआले.

शिर्डी येथे मल्टीस्टेट फेडरेशनचे अधिवेशन शुक्रवारी

संपन्न झाले. त्यामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले़ मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे,शिर्डीच्या नगराध्यक्षा योगीताताई शेळके , पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, सराफ असो़चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रताप साळुंखे, गोदावरी मल्टीस्टेटच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील,अ‍ॅड़ अंजली पाटील,अ‍ॅड़ एस एस गडगे यांच्या हस्ते
हा पुरस्कार देण्यात आले.
भगवंत मल्टीस्टेटच्या वतीने चेअरमन संतोष ठोंबरे, व्हॉईस चेअरमन शहाजी फुरडे-पाटील ,संचालक सतिश देवकर, विलास निंबाळकर, निळकंठ शेळके, सचिव प्रदीप औसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद कांबळे यांनी हा पुरस्कार स्विकारला.
भगवंत मल्टीस्टेट सोसायटीची स्थापना ही चार वर्षापुर्वी संतोष ठोंबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली असून चार वर्षात २० कोटींच्या ठेवी, १८ कोटी कर्जवाटप ,सव्वा दोन कोटी भागभांडवल व ९० लाख रुपये नफा अशी संस्थेची भक्कम अर्थिक स्थिती असून भगवंत जयंतीच्या निमीत्ताने व्याख्यानमाला, विविध विषयावरील मान्यवरांची व्याख्याने, जलयुक्त शिवार अभियानासाठी मदत, आदी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात़ संस्थेला यापुर्वी सह्याद्री फांऊडेशन सह विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत़ संस्थेच्या बार्शी, वैराग, पांगरी व परांडा या चार ठिकाणी शाखा असून ग्राहकांना कोअर बँकींग,एटीएम सह सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरवल्या जातात़ या कार्याची दखल घेऊन फेडरेशनचे हा पुरस्कार दिला असल्याचे संस्थेचे चेअरमन संतोष ठोंबरे यांनी सांगीतले.संस्थेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संचालक मंडळाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

admin: