बार्शीला नेहमी विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोपल यांनाच विजयी करा-राहुल सोलापूरकर

बार्शी ः  महिलांचा अपमान नव्हे तर आदर करणे ही भारतीय संस्कृती आहे आणि अख्खी शिवसेना ताब्यात असताना देखील स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पत्नीला मानायचे स्व.मीनाताईंचा शब्द कधी खाली टाकला नाही. आज महिला राजकारणात सक्रीय होऊन काम करतात देशात स्त्रीयांना सन्मान  आहे. बार्शीत एका महिलेचा केलेला अपमान बार्शीकरांनी सहन करू नये असे आवाहन प्रसिध्द सिने अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी केले.


बार्शीत बुधवारी (ता.16) रात्री शिवेसना भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या प्रचारार्थ  उपळाई रोड येथे आयोजित सभेत सोलापूरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार दिलीप सोपल, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, युवा नेते आर्यन सोपल, बार्शी नगपरिषद विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, आबाजी पवार, आप्पा पवार, शशिकांत गव्हाणे, मनिषा नान्नजकर, मंगल पाटील, मंदा काळे, मंगलताई शेळवणे, अ‍ॅड.विकास जाधव उपस्थित होते.

सोलापूरकर म्हणाले, एकीकडे कायदेपंडीत, सुशिक्षित उमेदवार व एकीकडे ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही ज्यांच्या टेंडर पास करण्याच्या पध्दती पहील्या तर रस्त्यावरील क्राँकीटकरणात किती खाल्ले हे दिसते. त्यामुळे भ्रष्टाराचा हा ट्रॅक्टर वेळीच पंक्चर करा ते काम मतदार म्हणून आपण करावे. जर हा ट्रॅक्टर चालू राहिला तर उपसा सुरूच राहणार त्यामुळे तो जागेवरच थांबवा. एकादाच आमदार झाले तर पाच वरून पाचशे एकराचे मालक झाले.

मुरूम, दगड, वाळू यांचाच कसा, शहरवासीयांनी पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही आणि यांच्या शेतातील ऊस, भुईमूगाला मात्र पाणी कोठून मिळते याचाही मतदारानी विचार केला पाहिजे. यांना सगळच कस पचत असा सवाल करत चोवीसतास राजकारण करणार्‍यांना समाजकारण दिसत नाही अशांना बाजूला करा. राजकारण करताना कोणालाही मोठे केले नाही सख्ख्या पुतण्यालाही ज्यांना रक्ताची नाती कळत नाही जे कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडून केवळ गुंड पोसण्याचे काम करतात त्यांना जवळ करू नका असे आवाहनही सोलापूरकर यांनी केले.

सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या पायाशी लोळण घेणार्‍या, लांड्या लबाड्या करणार्‍यांना डोक्यावर न घेता आमदारकी, मंत्रीपदाच्या माध्यमातून अनेक शासकीय योजना बार्शीत राबवून बार्शीला नेहमी विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला  त्या सोपलांचे धनुष्यबाण हे चिन्हा कायम मनात ठेवा व प्रचंड मताधिक्क्याने निवडुण द्या असे आवाहन शेवटी सोलापूरकर यांनी केले.

यावेळी दिलीप सोपल, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, युवा नेते आर्यन सोपल यांनी भाषणे केली. सूत्रंसचालन नागेश अक्कलकोटे यांनी केले तर आभार अ‍ॅड.विकास जाधव यांनी मानले. सभेसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

चौकट ः विनोद नाना वाणी यांनी भाजपात (राजेंद्र मिरगणे गट) प्रवेश केल्याने त्यांचा सत्कार सोलापूरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: