बार्शीत ४ मोटारसायकल चोरांना अटक ,  ११ चोरीच्या मोटारसायकलसह एका गुन्हयातील पीकअपही   हस्तगत

बार्शीत ४ मोटारसायकल चोरांना अटक ,  ११ चोरीच्या मोटारसायकलसह एक गुन्हयातील पीकअप  हस्तगत

बार्शी : बार्शी शहर व परिसर तसेच आसपासच्या जिल्हयातून चोरी केलेल्या मोटारसायकलप्रकरणी सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ४ संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीच्या ११ मोटारसायकली तसेच गुन्हयासाठी वापरलेले १ पिकअप वाहनही जप्त केले. सोमनाथ रावसाहेब क्षिरसागर (वय २९), संदीप फकीर शिंदे (वय २८), दत्तात्रय विठ्ठल सावंत (वय ४८ तिघे रा. काजळा ता जि. उस्मानाबाद ) व युवराज अशोक उपळाईकर (वय ४२ रा. तेलगिरणी चौक, स्टेशन रोड, बार्शी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान, या चौघांना बार्शी शहर पोलीसांनी बुधवारी न्यायालयात हजर केले असता चौघांना दि. १० पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

बार्शी शहर व परिसरातून मागील कांही महिन्यात वेगवेगळया ठिकाणाहून अनेक मोटारसायकलींची चोरी झाली होती. अमृता हुकिरे यांनीही त्यांची स्कूटर चोरीची फिर्याद दिली होती. या चोऱ्यांच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस तपास करत होते. यादरम्यान, सहायक पो.नि. आपटे व त्यांच्या पथकास या गुन्हयातील आरोपी सोमनाथ क्षिरसागर बार्शी शहर एस टी स्टॅण्डवर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी त्यास ताब्यात घेवून नंतर त्याच्या इतर ३ साथीदारांनाही पकडले.

त्याच्याकडून चोरलेली सदरची स्कूटर व अहमदनगर, उस्मानाबाद जिल्हयातून व बार्शी शहर परिसरातून चोरलेल्या ११ मोटारसायकली जप्त केल्या. तसेच या गुन्हयात वापरलेले पिकअप वाहन जप्त केले. सदरच्या चौघा संशयितांना एलसीबी पथकाने बार्शी शहर पोलीसांकडे सोपविले. बार्शी पोलीसांनी चौघांना मंगळवारी रात्री अटक केली.

न्यायालयात हजर करून अधिक तपासासाठी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दि. १० पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस तपासात संशयितांकडून आणखी चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्वर भोरे व पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.सचिन आटपाडकर अधिक तपास करत आहेत. 

अशी आहेत संशयितांकडून जप्त केलेली वाहने 

पोलीसांनी जप्त केलेल्या मोटारसायकलमध्ये एक पांढऱ्या रंगाची वेगो, वेगवेगळया कलरच्या ४ बुलेट, स्पेंडर, होंडा शाईन, २ युनिकॉर्न, यामाहा कंपनीची दुचाकी, प्लॅटिना व एक पिकअप (एमएच २५ पी ४९७०

ग्लोबल न्युज नेटवर्क: