बार्शीत म्हसोबाच्या मंदीरात आढळला अल्पवयीन मुलाचा मृतदेह , मृत्युचे कारण अस्पष्ठ

गणेश भोळे
बार्शी : घरातुन बाहेर पडलेल्या अल्पवयीन १४वर्षीय मुलाचा मृतदेह आज सोमवारी दि.२९ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बार्शी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागच्या वेअर हाऊस रोडवरील म्हसोबा मंदिरात आढळुन आल्यामुळे बार्शी शहरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत बार्शी शहरात दिवसभर तर्क वितर्क लढवले जात आहेत.

आदेश तानाजी भोसले (वय १४ रा.नाळे प्लाॅट,बार्शी) असे त्या मृत अवस्थेत आढळुन आलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.

गफुर हसन पटेल वय ५४ रा.नाळे प्लाॅट,बार्शी यांनी याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात घटनेची खबर दिली आहे. पटेल यांनी दिलेल्या खबरीत म्हटले आहे कि भोसले हा अल्पवयीन मुलगा आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास म्हसोबा मंदिरात मयत अवस्थेत आढळुन आला.
मयत हा काल रविवारी दुपारी४ वाजण्याच्या सुमारास त्याच्या नाळे प्लाॅट,भागातील राहत्या घरामधुन बाहेर पडला होता. त्यानंतर तो रात्रभर घराकडे परतला नव्हता.मात्र आज सकाळी त्याचा मृतदेहच मंदिरात आढळुन आला.मृतदेह आढळुन आल्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.त्यानंतर मृतदेह ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आला. तेथे शवविच्छेदन करूण त्याचा व्हिसेरा राखुन ठेवण्यात आला आहे.

बालकाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याचे निश्चित कारण वृत्त पाठवेपर्यंत समजु शकले नाही.याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद घेण्यात आली आहे.अधिक तपास हवालदार शाम गव्हाणे हे करत आहेत.

admin: