बार्शीत भगवंत महोत्सवाचा शुभारंभ, शहरातील डॉक्टरांच्या हस्ते झाले महोत्सवाचे उदघाटन, सहा दिवस अध्यात्मिक- सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

गणेश भोळे/ एच सुदर्शन

बार्शी : बार्शी नगरपरिषद व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भगवंत महोत्सव समिती आयोजित दुसऱ्या भगवंत महोत्सवाचे उदघाटन शहरातील धन्वंतरी अमित पडवळ, गणेश सातपुते, हरीश कुलकर्णी, विजयकुमार केसकर, संतोष बिनवडे, अरविंद बोपलकर, सिद्धेश्वर शिराळ, प्रदीप जाधव, हेमंत साने यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, रमेश पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी शिवाजी गवळी, सोजर समूहाचे प्रमुख अरुण बारबोले, भगवंत महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष लोढा, भगवंत देवस्थान ट्रस्ट चे सरपंच दिलीप बुडूख, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, कुंडलिक गायकवाड, वासुदेव ढगे, अनिल पाटील, नाना सुरवसे, बाबा मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, देशात भगवंताचे एकमेव मंदिर आहे. ग्रामदैवत भगवंताची कीर्ती दूरवर पोहोचावी तसेच अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून शहर व परिसरातील नागरिकांचे अध्यात्मिक व सांस्कृतिक मनोरंजन व्हावे यासाठी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. विद्यार्थी मदत, गोरक्षण(पशुधन) मदत, आरोग्य शिबीर असे उपक्रम राबवून हा महोत्सव अधिक व्यापक करण्याचा मानस आहे. त्यासाठी शहरवासीयांनी, भगवंत भक्तांनी आपल्यापरीने देणगी देवून सहकार्य करावे असे आवाहन केले.

डॉ विजयकुमार केसकर म्हणाले, पूर्वी शहरात सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जात होते. खंडित झालेली ही परंपरा सुरू केल्याबद्दल व डॉक्टरांचा यथोचित सन्मान केल्याबद्दल संयोजकांचे आभार मानले.

श्रीधर कांबळे म्हणाले, माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिलेल्या प्रेरणेतुन हा महोत्सव साजरा होत आहे. गत वर्षी शहरवासीयांनी महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला. सहकारी बाजार समितीतील सत्ताधारी गटाचे मार्गदर्शक राजेंद्र राऊत यांनी महोत्सवासाठी पुढील वर्षी पासून सहकारी बाजार समितीच्या वतीने दरवर्षी १० लाख देणार असल्याचे सांगितले.

नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी सहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा शहर व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

प्रास्ताविकात अभिजित सोनिग्रा यांनी ११ हजार वार्षिक देणगीदार म्हणून २६ जण पुढे आल्याचे सांगितले. उदघाटनानंतर शांतेच कार्ट चालू आहे हे नाटक झाले. भाऊ कदम, विशाखा सुभेदार यांच्यासह सहकाऱ्यांच्या कॉमेडीने रसिकांना खळखळून हसविले.

कार्यक्रमासाठी संतोष सूर्यवंशी, रावसाहेब मनगिरे, अभिजित सोनिग्रा, तुकाराम माने, श्रीधर कांबळे, दीपक राऊत, विजय चव्हाण, दामोदर काळदाते, प्रशांत खराडे, संतोष बारंगुळे, भरतेश गांधी, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब तातेड आदी परिश्रम घेत आहेत. अजित कुंकुलोळ यांनी सूत्रसंचालन केले.

रविवारचे कार्यक्रम

सायंकाळी साडे सहा वाजता भगवंत मंदिरात ह. भ. प. तुकाराम मस्के महाराज यांचे आनंदाचे डोही आनंद तरंग या विषयावर कीर्तन तर सायंकाळी साडेसात वाजता गौरव महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार आहे.

फोटो : बंटी काळे, बार्शी

admin: