बार्शीत दिलीप सोपलांनी केला शिवसेनेकडून अर्ज दाखल

बार्शी: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवसाचा अवधी शिल्लक असताना शिवसेना- भाजप महायुती चे उमेदवार दिलीप सोपल यांनी अर्ज दाखल केला.

सोपल यांनी यापूर्वी ही अर्ज दाखल केला आहे. मात्र आज मुहूर्त साधत आणखी एक अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी शिवसेनेचा अधिकृत ए बी फॉर्म ही जोडला आहे.

यावेळी त्यांच्या समवेत युवराज काटे, नंदकुमार काशीद, नागेश अक्कलकोटे, दत्तात्रय शिंदे, माजी नगराध्यक्ष गणेश जाधव, देवा दिंडोरे, विनायकराव गरड आदी उपस्थित होते.

सोपल हे गेल्या एक महिन्यापासून मतदारसंघात गावभेटी देत फिरत आहेत. तसेच आर्यन सोपल ही त्यांची स्वतंत्र यंत्रणा घेऊन प्रचार करत आहेत.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: