बार्शीतील राज्यस्तरीय मराठा वधू वर परिचय मेळाव्यात १३३५ वधु-वरांची उपस्थिती सकल मराठा समाज व राजाभाऊ राऊत मित्र मंडळाने केले होते आयोजन

बार्शी: सकल मराठा समाज बार्शी तालुका व राजाभाऊ राऊत मित्र मंडळाच्या वतीने बार्शी यांच्या वतीने बाशर््ी येथे आयोजित राज्यस्तरीय मराठा वधू वर परिचय मेळाव्यात जिल्ह्यासह राज्यभरातील मराठा समाजबांधनांनी मोठी उपस्थिती लावली़ दिवसभर सुुरु असलेल्या या मेळाव्यात १३३५ उपवरांनी आपला परिचय करुन दिला.

पदमकृष्ण मंगल कार्यालय उपळाई रोड येथे संपन्न झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन माढा लोकसभेचे नुतन खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर,माजी आमदार राजेंद्र राऊत ,विश्वास बारबोले , सोलापूर सकल मराठा समाजाचे समन्वयक दत्ता मुळे, उपसभापती अविनाश मांजरे, बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील,सोजर उद्योग समुहाचे प्रमुख अरूण बारबोले, संतोष निंबाळकर ,जयकुमार शितोळे, माजी आयुक्त विश्वास भोसले, अनिल डिसले,कुंडलिक गायकवाड, बप्पा गव्हाणे,अ‍ॅड पी.आर करंजकर ,जि़प़ सदस्य किरण मोरे, मदन दराडे,उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले,दिलीप मोहिते,महादेव बारंगुुळे, माधव देशमुख, बाबा मोरे,कौरव माने, अ‍ॅड़ अनिल पाटील, यांच्यासह मराठा समाजाचे विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या मेळाव्यासाठी बार्शी व परिसरासह उस्मानाबाद व आसपासच्या तालुक्यातील मोठ्या संख्येने पालक व वधु-वर उपस्थित होते़ यामध्ये दहावी-बारावी शिक्षण झाल्यापासून ते शेतकरी, व्यावसायिक, इंजिनिअर, डॉक्टर ,प्राध्यापक, विविध शासकिय व खाजगी क्षेत्रात नौकरी करणाºया मुला-मुलींचा समावेश होता़ दुपारी बारा वाजता सुरु झालेला हा परिचय मेळावा सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु होता़

स्टेजवर वधु व वरांची माहिती वाचून दाखवून मोबाईल क्रमांक दिले जात होते़ यानंतर पालक अनुरुप परिवाराशी संपर्क साधत होते़ या परिचय मेळाव्यात आलेल्या विवाहोत्सुकांना आणखींन संपर्क साधणे सोयीचे व्हावे यासाठी पंधरा दिवसात पुस्तीका प्रसिध्द करणार असल्याचे प्रास्ताविकात संयोजक दिलीप सुरवसे यांनी सांगीतले़

मेळावा यशस्वी करण्यासाठी दिलीप सुरवसे, नारायण जगदाळे,किरण गाढवे,रावसाहेब यादव, मदनलाल गव्हाणे, महेश देशमुख ,उमेश काळे, विजय राऊत, मंगेश दहिहांडे, संदीप मिरगणे, विजय जाधव, राहूल तावरे, अजय पाटील, चंद्रकांत राऊत, चैतन्य जगदाळे, उमेश काळे,शैलजा गिते, मंजुषा काटकर,साखरे मॅडम यांनी परिश्रम घेतले़ या मेळाव्यासाठी माजी आ़ राजेंद्र राऊत यांनी सर्वांसाठी भोजनाची सोय केली होती.

धिरज करळे: