बाबरी मशीद मोकळ्या जागी बांधण्यात आलेली नव्हती : सुप्रीम कोर्ट


हायकोर्टाचा निकाल पूर्ण पारदर्शकतेनं घेण्यात आला आहे. बाबरी मशीद मोकळ्या जागेवर बांधण्यात आली नसल्याचे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याचा निकाल वाचण्यास सुरुवात केली आहे.. सरन्यायाधीश रंजन गोगोई निकालाचे वाचन करत आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये अयोध्याचा स्पष्ट निकाल लागणार आहे. अयोध्येतील 2.77 एकर जमिनीचा हा वाद आहे. सुप्रीम कोर्ट या जमिनीचा मालकी हक्क निश्चित करणार आहे. एएसआयच्या उत्खननातून मिळालेल्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. हायकोर्टाचा निकाल पूर्ण पारदर्शकतेनं घेण्यात आला आहे. बाबरी मशीद मोकळ्या जागेवर बांधण्यात आली नसल्याचे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

पुरातत्व विभागाच्या उत्खननातून मिळालेल्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. हायकोर्टाने यासंबंधी दिलेला निकाल पूर्ण पारदर्शी होता. बाबरी मशीद मोकळ्या जागेवर बांधण्यात आलेली नव्हती. मशिदीच्या खाली आवाढव्य संरचना होती. 12 व्या शतकातील मंदिर असं पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आलं होतं. ज्या कलाकृती आढळून आल्या होत्या, त्या इस्लामिक नसल्याचे कोर्टानेसांगितले आहे. तसेच वास्तूमध्ये जुन्या वास्तूंच्या वस्तूंचा वापर करण्यात आला होता. मात्र, पुरातत्वच्या अहवालावर विश्वास ठेवू शकत नाही, असं मुस्लीम पक्षकारांकडून वारंवार सांगितलं जात होतं, असही पुढे कोर्टाने म्हटलं आहे.

शिया विरुद्ध सुन्नी प्रकरणी एकमतानं निकाल देण्यात आला आहे. शिया वक्फ बोर्डानं केलेलं अपील फेटाळण्यात आली आहे. मशीद कधी बांधली यानं फरक पडत नाही. 22-23 डिसेंबर 1949 रोजी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. एका व्यक्तीची श्रद्धा दुसऱ्याचा अधिकार हिरावून घेऊ शकणार नाही. नमाज पठण करण्याच्या जागेला मशीद मानण्यास नकार देऊ शकत नाही. ही जागा सरकारी असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे

ग्लोबल न्युज नेटवर्क: