सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर, मात्र समाधानी नाही – सुन्नी वक्फ बोर्ड

नवी दिल्ली । भारतातील सर्वात जास्त प्रलंबित असलेल्या खटल्यांपैकी एक असलेल्या अयोध्या खटल्याचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणेही नोंदवली आहेत. न्यायालय म्हणाले की, आस्था आणि श्रद्धेपेक्षाही न्याय सर्वश्रेष्ठ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे. वादग्रस्त 5 एकर जमीन रामजन्म भूमी न्यासाला देण्याचे माननीय न्यायालयाने घोषित केले आहे. दुसरीकडे, दुसरे पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डालाही अयोध्येतच 5 एकर जागा देण्याचे निकालात म्हटले आहे.

यावर सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील जिलानी यांनी निकालाचे स्वागत करतानाच हा निकाल समाधानकारक नसल्याचे म्हटले आहे. याबाबत आम्ही ज्येष्ठ विधिज्ञ राजीव धवन यांच्याशी चर्चा करून पुढील कायदेशीर बाबी पडताळून पाहू असे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा आम्ही आदर करतो, आणि समाजातील सर्व घटकांना आवाहन करतो की, त्यांनी शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य करू नये, असेही सांगायला जिलानी विसरलेले नाहीत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: