पुनः आपलं सरकार आलं तर..पक्षांतर करणाऱ्यांना अजित पवारांनी फटकारले

पिंपरी: “वेगवेगळ्या कारणांमुळे पक्षांतर होत आहे. तिसऱ्या टप्प्यात अजून काही पक्षांतर करतील. ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊद्या. पण, पुन्हा आपलं सरकार आलं, तर दादा जाऊद्या पक्ष्यात परत घ्या अस सांगायला येऊ नका. मी तर घेणार नाहीच पण, तुम्हीही आग्रह करू नका असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षांतर करणाऱ्यांना चिमटा काढला.

“भाजपाने कितीही ताणले तरी शिवसेना आणि भाजपा पक्षाची शंभर टक्के युती होणारच. शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. शिवसेनेला भाजपाशिवाय गत्यंतर नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना आता राहिली नाही. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे कमळाबाईला वाकवायचे, सरळ करायचे. परंतु आता उलट चाललंय “, असे म्हणत पवार यांनी शिवसेनेला जोरदार टोलाही लगावला आहे.

रविवारी (दि.22) पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी पक्षांतर केलेल्या नेत्यांवरही निशाणा साधला. “राजे, सरसेनापती आणि काही नेते भाजपात गेलेले आहेत. परंतु, मी डगमगलो नाही, आमच्या बरोबर आमचा कार्यकर्ता आहे. आम्ही कोणाच्या बापालाही घाबरत नाही”, असे म्हणत पक्षांतर केलेल्या नेत्यांवर माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, “कोणी रुसायचं नाही किंवा फुगायचं नाही. नाराज होऊ नका, ज्यांना तिकीट दिलं जाणार नाही त्यांना दुसरीकडे संधी दिली जाईल”, असे अजित पवार म्हणाले.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: