पुणे कसोटीत भारताचे दिवाळीआधीच फटाके, विराटचे शानदार द्विशतक, भारत 601-5

पुणे । भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडिया प्रथम फलंदाजीस उतरली आणि 5 गडी गमावूम 601 धावा केल्या आणि पहिला डाव घोषित केला. विराट कोहलीने नाबाद 254 धावा केल्या.

कसोटीतील कोहलीचे सातवे द्विशतक

कर्णधार विराट कोहलीने कसोटी कारकीर्दीतील आपले सातवे द्विशतक शतक ठोकले आहे. विशेष म्हणजे त्याने सातही द्विशतक शतक कर्णधार म्हणून केले आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक दुहेरी शतक ठोकणार्‍या फलंदाजांच्या यादीत कोहली अव्वल आहे. या यादीमध्ये वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लारा 5 दुहेरी शतकांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे

कर्णधार म्हणून सर्वात जास्त दुहेरी शतक

7 – विराट कोहली

5 – ब्रायन लारा

4 – सर डॉन ब्रॅडमन / ग्रॅमी स्मिथ / मायकेल क्लार्क

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: