पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या; देशभरातली जनता पाठीशी उभी राहील-अजित पवार

केंद्र सरकारनं सोमवारी ऐतिहासिक यश मिळवत जम्मू-कश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द करण्याचे विधेयक मंजूर केले. राज्यसभेमध्ये या विधेयकावर दीर्घ चर्चा झाली. यानंतर 125 विरुद्ध 61 मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आली. या विधेयकाला काही पक्षांनी पाठिंबा दर्शवला तर काहींनी याला विरोध केला आहे.

विधेयक मंजूर झाल्यानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. विविध पक्षांच्या राजकारण्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अजितदादांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर पवारांनी हा निर्णय घेताना जनता आणि विरोधकांना विश्वासात घ्यायला हवं होतं, असं म्हटले आहे.

अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंट एक पोस्ट प्रसिद्ध केली असुन त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,
सरकारनं ३७० कलम रद्दबातल करून चांगला आणि ऐतिहासिक निर्णय घेतला. १८ पगड जातीचे लोक एकत्र राहावेत, देश एकसंघ राहावा म्हणून असे निर्णय घेणं गरजेचं आहे. आता पुढे खबरदारी बाळगून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या; देशभरातली जनता पाठीशी उभी राहील. यात राजकारण नको.

ग्लोबल न्युज नेटवर्क: